Randeep Hooda in the midst of controversy for making obscene jokes on Mayawati
Randeep Hooda in the midst of controversy for making obscene jokes on Mayawati 
मनोरंजन

मायावतींवर अश्लिल विनोद केल्यामुळे रणदीप हुड्डा वादाच्या भोवऱ्यात

गोमंन्तक वृत्तसेवा

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) बोलताना कोणत्याही प्रकारच्या तारतम्याचा विचार न करता एखादं वक्तव्य करुन मोकळे होतात. आणि मग त्यांच्यावर जाहीरपणे माफी मागण्याची वेळ येते. काही दिवसांपूर्वीच प्रसिध्द कॉमेडियन अबीश मॅथ्यू याने जुन्या ट्विटवरुन बहुजन पक्षाच्या अध्यक्षा मयावतींची(Mayawati) माफी मागितली होती. या ट्विटमध्ये मॅथ्यूने मयावतींबद्दल अपमानजनक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेता रणदिप हुड्डा (Randeep Hooda) उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मयावती यांच्यावर अश्लिल विनोद करताना दिसून आला आहे. (Randeep Hooda in the midst of controversy for making obscene jokes on Mayawati)

या व्हिडिओमध्ये अभिनेता रणदिप हुड्डा एका शो दरम्यान प्रेक्षकांना अश्लिल विनोद सांगत असताना दिसत आहे. या दरम्यान तो म्हणाला,  तुम्हाला एक अश्लिल जोक सांगतो...  मिस मायावती एका गल्लीमधून दोन मुलांसोबत जात होत्या. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तिने विचारले की, हे दोन्ही मुलं जुळे आहेत का?  यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, नाही एक 4 वर्षाचा आहे आणि दुसरा 8 वर्षाचा आहे. त्यानंतर तो व्यक्ती म्हणाला, मला विश्वासच होत नाही की एक व्यक्ती तिथे दोन वेळा जाऊ शकतो.''

अभिनेता रणदीप हुड्डाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता लोकांना यावर विश्वास बसत नाही. त्याच्या या व्हिडिओमुळे रणदीप सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. रणदीपचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याने यासंबंधी माफी मागावी अशी मागणी नेटीझन्सकडून करण्यात येत आहे.

ज्या अभिनेत्याने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर लाखो प्रक्षेकांची मनं जिंकली त्याच अभिनेत्याकडून असा अश्लिल विनोद ऐकायला मिळत असल्यानं त्याचे चाहते भलतेच नाराज झाले आहेत. 'किक', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुबंई', 'साहेब बीबी और गॅंगस्टर' या सारख्या चित्रपटामधून सहकलाकार आणि सरबजित या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेतून झळकलेला रणदीप आज कित्यके लोकांच्या मनातून उतरला आहे. नुकतंच रिलीज झालेल्या राधे (Radhe) चित्रपटात सुध्दा रणदीपने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT