Ranbir Kapoor's Animal First Look | Animal First Look Out | Ranbir Kapoor's Latest Movie Look Dainik Gomantak
मनोरंजन

Animal First Look: रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल'चे नव्या वर्षात फर्स्ट लूक रिलीज!

Ranbir Kapoor Animal: सुपरस्टार रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'Animal' चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरचा प्रसिद्ध चित्रपट 'अनिमल'चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला आहे. 'अॅनिमल' (Animal) च्या या फर्स्ट लूक पोस्टरची रिलीज डेट 30 डिसेंबरलाच जाहीर करण्यात आली होती. अशा स्थितीत नववर्षाच्या मध्यरात्री 'अ‍ॅनिमल'चे दमदार फर्स्ट लूक पोस्टर चाहत्यांची उत्कंठा वाढवणारे आहे. 'अॅनिमल'च्या या पोस्टरमध्ये रणबीर कपूर अतिशय उग्र स्टाईलमध्ये दिसत आहे. 

  • 'अॅनिमल'चे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले

नवीन वर्षाच्या (New Year) मध्यरात्री 12 वाजता चित्रपट (Movie) समीक्षक तरण आदर्श यांनी अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'अॅनिमल'चे (Animal) फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुपरस्टार एका नव्या अंदाजात पाहायला मिळत आहे. हातात कुऱ्हाड, तोंडात सिगारेट आणि रक्ताने माखलेला रणबीर कपूर खूपच धोकादायक दिसत आहे. 'अॅनिमल'च्या या फर्स्ट लूक पोस्टरवरून स्पष्टपणे असा अंदाज लावता येतो की, शमशेरा चित्रपटाप्रमाणेच यावेळीही प्रेक्षकांना रणबीरचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. 'अ‍ॅनिमल'च्या या पोस्टरने चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित केली आहे. 'अॅनिमल'चे हे लेटेस्ट पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) खूप पसंत केले जात आहे. 

'अ‍ॅनिमल'' कधी प्रदर्शित होणार? 

'अ‍ॅनिमल'' (Ranbir Kapoor) चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहते या चित्रपटाच्या रिलीजसाठी आतुर होते. 11 ऑगस्ट 2023 रोजी रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल'' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार रणबीर कपूरशिवाय साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर आणि बॉबी देओल रणबीरसोबत 'अ‍ॅनिमल'मध्ये धमाल करताना दिसणार आहेत. संदीप रेड्डी वंगा यांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT