Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Kapoor: चित्रपटात काम करण्यासाठी संजय लीला भन्साळीसमोर रणबीरच्या अटी

Ranbir Kapoor: हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असेल आणि या चित्रपटासाठी अभिनेत्याने दिग्दर्शकासमोर अनेक अटी ठेवल्या असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Ranbir Kapoor: रणबीर कपूर तब्बल १७ वर्षांनंतर संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्टही दिसणार असून विकी कौशल दिसणार आहे. 'सावरिया' चित्रपटानंतर तब्बल 17 वर्षांनी रणबीर कपूर भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असेल आणि या चित्रपटासाठी अभिनेत्याने दिग्दर्शकासमोर अनेक अटी ठेवल्या असल्याचे बोलले जात आहे.

सावरिया चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि संजय लीला भन्साळी यांच्यामध्ये मतभेद झाल्याचे म्हटले जात होते. आता तब्बल १७ वर्षानंतर ते पुन्हा एकत्र काम करणार असून त्यांचे संबंध आलियाने सुधारल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपटाबाबत रणबीरने भन्साळींसमोर मोठी अट ठेवली आहे की, चित्रपटाचे शूटिंग निर्धारित वेळेत पूर्ण करावे. याचे कारण म्हणजे 'लव्ह अँड वॉर'नंतरही या अभिनेत्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी नोव्हेंबरपासून सुरू होऊन पुढील वर्षी जुलैमध्ये संपेल, अशी हमीही दिग्दर्शकाने दिली आहे.

2025 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर भन्साळींचा मल्टीस्टारर चित्रपट 'लव्ह अँड वॉर' रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची घोषणा पोस्टर आलिया भट्ट आणि विकी कौशल यांनी आपापल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

POP Ganesh Idols: बंदी असतानाही पीओपीचा वापर! फोंड्यातील गणेशमूर्ती कार्यशाळेवर छापा, मूर्ती जप्त

Rohit-Virat Retirement: विराट-रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? BCCI उपाध्यक्षांचा मोठा खुलासा, म्हणाले, '...गरज नाही'

SCROLL FOR NEXT