Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Kapoor: ना नायक ना खलनायक 'लव्ह अँड वॉर' मध्ये अशी असणार रणबीर कपूरची भूमिका

Ranbir Kapoor: आता रणबीर जवळ त्यांचा हा शोध थांबला असून दोघे १७ वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Ranbir Kapoor: अ‍ॅनिमल चित्रपटात मुख्य भूमिका निभावलेला अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे मोठ्या चर्चेत आहे. आता तो एका नव्या भूमिकेतून पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या चित्रपटात तो दिसणार आहे.

यामध्ये त्याची पत्नी आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही एक ॲक्शन लव्ह स्टोरी असेल, ज्यामध्ये उत्तम संगीताचीही जोड असणार आहे. आता अॅनिमल नंतर रणबीरचे पात्र कसे असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. याबाबतदेखील मोठे अपडेटस समोर आले आहेत.

असे म्हटले जात आहे की, तो या चित्रपटात नायक किंवा खलनायक अशा कोणत्याही भूमिकेत असणार नाही. त्याचे पात्र ग्रे शेडमध्ये असेल. जे पूर्णत: चांगले किंवा वाईट असे म्हणता येणार नाही. आलिया आणि विकीच्या पात्रांमध्ये आव्हाने आहेत, पण भन्साळी अनेक वर्षांपासून अशा चेहऱ्याच्या शोधात होते, ज्यामध्ये नायकाची आणि खलनायकाची दोघांचीही झलक पाहायला मिळेल. आता रणबीर जवळ त्यांचा हा शोध थांबला असून दोघे १७ वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूर यांनी 'सावरियां' चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटातून रणबीरने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात सोनम कपूर आणि राणी मुखर्जीही दिसल्या होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला नव्हता. मात्र त्यातील गाणी आणि रणबीर लोकप्रिय झाले. त्याचा 'तौलिया' सीन आजही लोक विसरलेले नाहीत.

आता लव्ह अँड वॉर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. लवकरच शूटिंग सुरु होणार असून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT