Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir and Alia: रणबीर मध्यरात्री का बनला आलियाचा फोटोग्राफर?

आलियाने ट्रॉफीसह फोटो शेअर करत एक खास मॅसेज लिहिला आहे.

दैनिक गोमन्तक

Ranbir- Alia latest News: बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टला झी सिने अवॉर्ड्स 2023 मध्ये 'गंगूबाई काठियावाडी' मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. 

आलियाने ट्रॉफीसह एक सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. खास म्हणजे आलियाच्या खास क्षणाचा हा फोटो रणबीर कपूरने मध्यरात्री क्लिक केला होता. या फोटो खाली कॅप्शन लिहित आलियाने रणबीरचे आभार देखील मानले आहे.

  • आलियाने ट्रॉफीसह शेअर केला फोटो

आलियाने तिचा खास क्षणाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये (Photo) आलिया तिच्या बेडवर बसून ट्रॉफी हातात धरताना दिसत आहे. आलियाचा हा फोटो तिच्यासाठीही खास आहे. कारण तो फोटो रणबीर क्लिक केला आहे. आलियाने पहाटे 2 वाजता ‘फोटो’ क्लिक केल्याबद्दल रणबीरचे आभार मानले.

  • रणबीरने मध्यरात्री आलियाचा बनला फोटोग्राफर

आलियाने फोटो इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत लिहिले, "गंगू प्रेम. या सन्मानासाठी झी सिने अवॉर्ड्सचे आभार! सर मी तुमची आभारी आहे याचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत - भन्साळी प्रॉडक्शन. पहाटे 2 वाजता माझा फोटो क्लिक केल्याबद्दल माझ्या रणबीरचे खास आभार मानले आहे.

Alia Bhatt
  • दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान

या कार्यक्रमातील आलियाच्या लूकबद्दल सांगायचे तर, साध्या लूकमध्येही ती खूपच सुंदर दिसत होती. तिने हाय स्लिट ग्रीन गाऊन घातला होता. आलियाने अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर रणबीर कपूरला ब्रह्मास्त्र या चित्रपटामधील उत्तम भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट वर्क फ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, रणबीर कपूरचा श्रद्धा कपूरसोबतचा आगामी चित्रपट 'तू झुठी में मक्कर' लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तो रश्मिका मंदान्नासोबत 'अॅनिमल' मध्येही दिसणार आहे. दुसरीकडे, आलिया करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये तिचा गली बॉय को-स्टार रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

SCROLL FOR NEXT