Ranbir Kapoor became Best Boyfriend for Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Best Boyfriend: रणबीर कपूरच्या स्टाइलवर आलिया फिदा

आलियाच्या या चित्रपटासाठी रणबीर कपूरनेही खास पद्धतीने प्रमोशन केले.

दैनिक गोमन्तक

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधील बेस्ट कपलपैकी एक आहेत, दोघांमधील केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ' गंगूबाई काठियावाडी ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये आलियाच्या बोल्ड आणि कडक अंदाज बघायला मिळाला आहे. त्याचवेळी आलियाच्या या चित्रपटासाठी रणबीर कपूरनेही खास पद्धतीने प्रमोशन केले. नुकताच गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पैपराजींनी रणबीर कपूरला ट्रेलर कसा आवडला विचारले. यावर रणबीरने आलियाची नमस्ते पोज कॉपी करून दाखवली. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यानंतर आता आलियाने रणबीर कपूरला बेस्ट बॉयफ्रेंडही म्हटलं आहे. (Ranbir Kapoor became Best Boyfriend for Alia Bhatt)

रणबीर बेस्ट बॉयफ्रेंड

आलियाच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर सध्या खूप चर्चेत आहे. त्याचवेळी आलियाचा प्रेमाचा रंगही रणबीर कपूरवर चढला आहे. त्याने सर्वांसमोर तिची नमस्ते स्टाईल कॉपी करून आपले प्रेम व्यक्त केले. आता अशा परिस्थितीत आलिया देखील रणबीरच्या स्टाईलवर इतकी खूश होती की तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वतःचा आणि रणबीरचा एकाच पोजमध्ये असलेला फोटो शेअर केला आणि 'बेस्ट बॉयफ्रेंड' असे कॅप्शन दिले.

याआधीही आलिया अनेकदा सोशल मीडियावर रणबीरवरील प्रेम व्यक्त केले आहे. दोघे अनेकदा एकत्र पार्टी आणि व्हेकेशन साजरे करताना दिसतात. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या कुटुंबाचे देखील एकमेकांशी चांगले नाते आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन देखील या चित्रपटात काम करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT