Ranbir Kapoor  Dainik Gomanta
मनोरंजन

लग्नाचे लाडू खाऊन झाले आता कामाला चला; रणबीर शुटींग सेटवर

रणबीर लग्नाच्या दोन तीन दिवसानंतरच कामासाठी बाहेर पडताना दिसला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) यांचं अलीकडेच शुभमंगल झालं. या लग्नसोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून आलिया-रणबीरच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरु होती. अखेर मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात यांचे लग्न पार पडले. आलियाने (Alia Bhatt) सोशल मीडियावर लग्न आणि मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान रणबीर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी आला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायर होताना दिसत आहे.

रणबीर लग्नाच्या दोन तीन दिवसानंतरच कामासाठी बाहेर पडताना दिसला. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आज त्याचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यावेळी तो एका चित्रपटाच्या (Movie) शुटींगसाठी बाहेर पडल्याचे दिसुन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर त्याच्या कारमधून अंधेरीमध्ये आला आहे. त्यानं ब्ल्यु रंगाचा शर्ट आणि बेगी पँट परिधान केली होती. अनेक फोटोग्राफर्सनी रणबीरला स्पॉट करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

रणबीर आणि आलिया हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आलिया-रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर ते दोघे लग्न बंधनात अडकले. रणबीर आगामी चित्रपट 'शमशेर' तर आलियाने डार्लिंग्ज आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT