ranbir kapoor and alia bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

रणबीर कपूर अन् आलिया भट्टची लग्नाची शॉपिंग सुरू?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमधील (Bollywood) क्यूट कपलपैकी एक रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या सोशल मिडियावर (Social Media) सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलिया एप्रिल महिन्यात सात फेरे घेणार आहेत. रणबीर आणि आलिया भट्टचा साडी फॅशन ब्रॅंड आणि डिझाइनारसोबतचा फोटो (Photo) सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामुळे त्यांचे चाहते (Fans) चांगलेच उत्साहित झाले आहेत. या दोघांनीही लग्नाची शॉपिंग (Wedding Shopping) सुरू केल्याचे दिसत आहे.(ranbir kapoor alia bhatt started wedding shopping)

ब्राईडल कांचीपुरम साडी ब्रँडच्या सीईओ बीना कन्नन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आलिया आणि रणबीरसोबतच फोटो शेअर केला आहे. आलियाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि रणबीरने निळ्या रंगांचा शर्ट आणि जीन्स घातला आहे. या दोघांचा फोटो समोर येताच त्यांच्या चाहत्यांनी यांची लग्नाची शॉपिंग सुरू झालीय असा अंदाज बंधायला सुरुवात केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT