Ram Mandir  Dainik Gomantak
मनोरंजन

Ram Mandir: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे आलिया-रणबीरला मिळाले निमंत्रण; फोटो शेअर करत दिली माहिती

Ram Mandir: आता यामध्ये आलिया आणि रणबीरची भर पडली आहे.

दैनिक गोमन्तक

Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ या दिवसाची अनेकजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या दिवशी आयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मोठ्या धामधुमीत या उत्सवाची तयारी सुरु असून अनेक कलाकार आणि महत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. आता यामध्ये आलिया आणि रणबीरची भर पडली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. रामजन्मभूमी येथील बहुप्रतिक्षित ऐतिहासिक श्री राम मंदिर अवघ्या काही दिवसांत भक्तांसाठी खुले होणार आहे. या दिमाखदार कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

आता एकामागून एक या सेलिब्रिटींचे फोटो समोर येत आहेत आणि ते सांगत आहेत की त्यांना या खास क्षणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे फोटोही समोर आले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख श्री सुनील आंबेकर, आरएसएस कोकण प्रांत प्रचारप्रमुख श्री अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्याकडून श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.

रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, सनी देओल, अजय देवगण, प्रभास, आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ, यश आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, ​​संजय लीला यांसारखे सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मंदिर परिसरात राम लल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेच्या भव्य समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारीपासून भव्य उद्घाटनापूर्वी अनेक कार्यक्रम सुरू होतील. 4000 साधू-संतांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 7000 पाहुण्यांनाही या शुभ सोहळ्यासाठी आमंत्रणे प्राप्त झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT