Rakul Preet Singh-Jackky Bhagnani wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul Jackky Wedding : रितेश देशमुखचं जॅकी भगनानी सोबत आहे खास नातं, पत्नी जिनिलीया अन् भाऊ धीरजही जाणार लग्नाला

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani wedding: २१ फेब्रुवारी २०२४ ला गोव्यातील आयटीसी ग्रँड या हॉटेलमध्ये ते आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाच्या मोठ्या चर्चा सुरु आहेत. २१ फेब्रुवारी २०२४ ला गोव्यातील आयटीसी ग्रँड या हॉटेलमध्ये ते आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत.

यामध्ये अनेक बॉलीवू़ड कलाकार हजेरी लावणार आहेत. यापैकी देशमुख कुटुंबाची चर्चा रंगताना दिसत आहे. रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि धीरज देशमुखदेखील हा सोहळ्याचा महत्वाचा भाग असणार आहेत. देशमुख कुटुंबिय आणि जॅकी भगनानी यांच्यामध्ये खास नाते आहे, ते कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.

रितेश देशमुखचा लहान भाऊ धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा ही जॅकी भगनानीची बहिण आहे. दीपशिखा ही जॅकीप्रमाणेच हे चित्रपट निर्माती आहे. एका मुलाखतीदरम्यान, या बहिण-भावाच्या जोडीने चित्रपटातला आमच्यासाठी बॉक्स ऑफीसवरील आकड्यांपेक्षादेखील कंटेट खूप महत्वाचा आहे अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. सरबजीत हा त्यांचा पहिला चित्रपट होता. याशिवाय त्यांनी असेही म्हटले होते आपल्या वडिलांपेक्षा आपली प्रोडक्शन कंपनी वेगळी आहे.

धीरज देशमुख आणि दीपशिखा यांनी २७ फेब्रुवारी २०१२ ला लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. वंश असे मुलाचे नाव असून दिवीयाना असे मुलीचे नाव आहे.दीपशिखामुळे रितेश देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाचे जॅकी भगनानी बरोबर एक खास नाते आहे. आता संपूर्ण कुटुंब रकुल आणि जॅकीच्या लग्नात हजेरी लावणार आहे.

दरम्यान, रितेश-जेनेलियाशिवाय, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांड्ये, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, शाहिद कपूर, भूमी पेडणेकर, इशा देओल, सोनम कपूर हे बॉलीवू़ड कलाकार या सोहळ्यासाठी गोव्यात पोहचणार आहेत. याबरोबरच रकुल आणि जॅकीने पर्यावरणपूरक लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानेदेखील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT