Rakul- jackky Postpone Honeymoon Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul- jackky Postpone Honeymoon: ...म्हणून रकुल प्रीत अन् जॅकी भगनानी लग्नानंतर जाणार नाहीत हनिमूनला

रकुल सिंग प्रित आणि भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Puja Bonkile

Rakul preet singh jackky bhagnani postpone honeymoon read reasons

बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी आता लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रकुल आणि जॅकीच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता एक नवीन गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे दोघेही लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत.

हनिमूनचा प्लॅन का कॅन्सल झाला?

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रकुल लग्नाच्या 3 दिवस आधीपर्यंत काम करेल आणि लग्नाच्या 1 आठवड्यानंतर तो एका बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. जॅकी, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ और छोटे मियाँ' या चित्रपटात व्यस्त असेल कारण निर्माता म्हणून हा त्याचा मोठा चित्रपट आहे. कामातून ब्रेक घेतल्यानंतर दोघेही नंतर हनिमूनचा प्लॅन नक्कीच करतील.

इको फ्रेंडली लग्न

रकुल आणि जॅकी इको फ्रेंडली लग्न करणार आहेत. दोघांनीही नातेवाईक आणि मित्रमंडळींना प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका दिली नसून ई-कार्ड दिले आहेत. तसेच लग्नात कोणीही फटाके फोडणार नाही आणि दोघे मिळून वृक्षारोपण करणार आहेत. या निर्णयामुळे चाहते सोशल मिडियावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

5 डिझायनर्स बनवणार लग्नाचे ड्रेस

रकुल आणि जॅकी अलीकडेच डिझायनर तरुण ताहिलानीच्या स्टुडिओमध्ये दिसले होते. दिल्ली टाइम्सच्या वृत्तानुसार, रकुल आणि जॅकीच्या लग्नासाठी 5 डिझायनर्सचे कपडे बनवणार आहेत. यामध्ये मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नाचे कपडे असतील. असेही बोलले जात आहे की काही आंतरराष्ट्रीय डिझायनर्स त्याच्या आउटफिट्सवर काम करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT