Actress Rakhi Sawant Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant Death Threat: 'सलमानपासून दूर राहा नाहीतर...' राखीला लॉरेंस बिश्नोई गॅंगचा धमकीचा ईमेल

Rakhi Sawant: सलमानला कडक सुरक्षा दिली असली तरी त्याला मारण्यात येईल.

दैनिक गोमन्तक

Rakhi Sawant Death Threat: राखी सावंत आपल्या विविध विधानामुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पून्हा एकदा चर्चेत आली आहे. तिला लॉरेंस बिश्नोई गॅंगने धमकी दिल्याची माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, राखी सावंतला लॉरेंस बिश्नोई गॅंगने इमेल पाठवत सलमान खानपासून दूर राहण्याची धमकी दिली आहे.

राखीने एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला आहे. याबरोबरच या धमकीच्या या मेलमध्ये असे म्हटले आहे की, सलमानला कडक सुरक्षा दिली असली तरी त्याला मारण्यात येईल.

सलमान खानबाबत बोललीस तर आम्ही तुला मारुन टाकू, असे या मेल मध्ये म्हटले आहे. मात्र मी तर सलमान बाबत बोलणार कारण माझी आई जेव्हा आजारी होती तेव्हा सलमान खानने मला मदत केली होती असे राखीने म्हटले आहे.

पुढे बोलताना राखीने म्हटले आहे की, कॅंसरपासून माझ्या आईला वाचवण्यासाठी सलमानने 50 लाख रुपए खर्च केले आहेत. मी का त्यांच्याबद्दल बोलू नये? लॉरेंस बिश्नोई गॅंगने सिद्धू मूसेवालाला पण मारुन टाकले.

माणूस जिंवत आहे तर त्याचा का स्टॅंड घेऊ नये ? मात्र राखीने या धमकीच्या मेलबाबत कोणतीही कायदेशीर अॅक्शन घेतली नाही. तिने म्हटले आहे की, मी कोणतेही कायदेशीर कारवाई करत नाही कारण सध्या मला भीती वाटत असून गोंधळलेली आहे. काय केले पाहिजे हे मला कळत नाहीए मी हे देवावर सोडून देत आहे असे राखीने म्हटले आहे.

प्रिंस माफी नावाच्या व्यक्तीने तिला मेल पाठवले होते. तो स्वत: गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या टोळीतील असल्याचा दावा करत आहे.

  • काय म्हटले आहे ईमेलमध्ये

राखी आमचे तुझ्यावर कोणतेही शत्रुत्व नाही. तू सलमान खानच्या प्रकरणात इन्वॉल्व हो नकोस. नाहीतर तुला प्रॉब्लेम होईल. सलमानला एवढ्या सुरक्षेनंतर आम्ही मारु आम्हाला कोणतीही भीती नाही. त्याचा घमंड आम्हाला तोडायचा आहे. एक तर त्याने गोल्डी भाईबरोबर बोलावे नाहीतर मरण्यासाठी तयार राहावे असे या मेलमध्ये म्हटले आहे .

दरम्यान, सलमान खानला 10 एप्रिलला लॉरेंस बिश्नोई गॅंगने धमकी दिल्याची माहीती समोर आली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खान आणि राखी सावंत यांच्यामध्ये खास नाते असल्याचे दिसून येते. आता राखीने हा खुलासा केल्यानंतर कोणती पाऊले उचलण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT