Actor Rajkummar Rao dainik gomantak
मनोरंजन

Rajkumar Rao : राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीय का? उत्तर देताना म्हणाला...

अभिनेता राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीय का? या प्रश्नावर आता स्वत: राजकुमार रावने उत्तर दिलं आहे.

Rahul sadolikar

राजकुमार राव हा बॉलिवूडचा एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. गॅंग्ज ऑफ वासेपूर , शादी मे जरूर आना, ट्रॅप, न्यूटन आणि आता आलेला भीड या चित्रपटांतुन राजकुमार रावने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. सध्या राजकुमार राव वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

अलीकडेच प्लास्टिक सर्जरी केल्याबद्दल लोकांनी राजकुमार रावला ट्रोल केले. आता राजकुमार राव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून या बातमीवर त्याने मौन सोडले आहे. अभिनेता राजकुमार रावने त्याच्या ताज्या मुलाखतीत सांगितले आहे की, त्याच्यावर खरोखर शस्त्रक्रिया झाली का?

अलीकडेच राजकुमार रावने एका मुलाखतीत संवाद साधला तेव्हा याबद्दल सांगितले . या मुलाखतीत त्याच्या 'भीड' चित्रपटापासून प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.या मुलाखतीत राजकुमार रावला एक कमेंट दाखवली ज्यात लिहिले होते की त्याने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? 

यावर राजकुमार राव म्हणाला, 'नाही भाऊ, प्लास्टिक सर्जरी झाली नाही.' स्वत:बद्दलच्या अशा बातम्या वाचून कसं वाटतं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तो म्हणाला, 'काही नाही, चेहऱ्यावर हसू येते. छान, लोक माझ्याबद्दल बोलत आहेत.

अलीकडेच, या बॉलीवूड अभिनेत्याने हेदेखील सांगितले की त्याला त्याच्या लुकबद्दल नकारांना कसे सामोरे जावे लागले. राजकुमार राव यांनी सांगितले होते की, त्यांना अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. 

कधी त्याला सांगितले गेले की तो उंच नाही, तर कोणी सांगितले की त्याचे व्यक्तिमत्व योग्य नाही. अभिनेत्याने सांगितले की लोकांना असे वाटायचे की माझ्या भुवया योग्य आकारात नाहीत आणि मी विचित्र दिसतो.

या संवादात राजकुमार रावने आपल्या अभिनयाबद्दल सांगितले आणि म्हणाला, 'अभिनयाचे काय? मला वाटतं अभिनय आणि काम या दोनच गोष्टी अभिनेत्याला पुढे घेऊन जातात बाकी काही नाही. इथे तुमची प्रतिभा बोलते आणि दुसरे काही नाही.

राजकुमार राव सध्या अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भीड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमीकेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT