Shilpa Shetty And Raj Kundra Dainik Gomantak
मनोरंजन

राज कुंद्राने केली शिल्पा शेट्टीला 'इतक्या' कोटींची संपत्ती ट्रान्सफर!

हा बंगला एकूण 5995 चौरस फुटांवर पसरलेला असून या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी असल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमन्तक

शिल्पा शेट्टीचा बिझनेसमन पती राज कुंद्रासाठी हे वर्ष खूप कठीण गेलं आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. सध्या तो तुरुंगातून बाहेर कुटुंबासह घरी आहे. पण सध्द्या अशी बातमी अशी आहे की, राज कुंद्राने आपल्या 'किनारा' बंगल्याचा एक मजला पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्राला हस्तांतरित केला आहे, ज्यामध्ये 5 फ्लॅट आहेत आणि या मालमत्तेची किंमत ही 38.5 असल्याचे सांगितले जाते. मात्र, मालमत्ता हस्तांतरणाबाबत दोघांपैकी एकाकडूनही अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

लविंग कपल प्रेमी कपलच्या यादीत

उल्लेखनीय म्हणजे या जोडप्याचं नाव बी-टाऊनच्यालविंग कपल मध्ये ही समाविष्ट आहे. त्यामुळे या दोघांचं खास बॉण्डिंग अनेक जोडप्यांना रिलेशनशिप गोल्स देऊन जातं. शिल्पा(Shilpa Shetty)-राज कुंद्राच्या (Raj Kundra) लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाले. 22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पाने राज कुंद्रासोबत सात फेरे घेतले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शिल्पा शेट्टी चित्रपटांतली मोठी अभिनेत्री, तर राज कुंद्राही श्रीमंत बिझनेसमन आहे. राज कुंद्रा यांनी पश्मिना शाल विकून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात कुंद्राचं नाव समोर आल्यानं शिल्पा थोडी नाराज झाली असली तरी तिनं ही बाब अत्यंत संयमानं घेतली.

शिल्पाच्या नावे 5 फ्लॅट्स

आता प्रॉपर्टी ट्रान्सफरबद्दल बोलूया,माध्यमांच्या माहीतीनुसार, राज कुंद्राने आपल्या 'किनारा' फ्लॅटचा पहिला मजला शिल्पाच्या नावावर केला आहे. या मजल्यावर 5 फ्लॅट आहेत. या मालमत्तेची किंमत 38.5 असल्याचे सांगितले जाते. या कागदपत्रानुसार, शिल्पा शेट्टीने फ्लॅट ट्रान्सफर करण्यासाठी 1.9 कोटी रू. मुद्रांक शुल्क भरले असून 21 जानेवारी 2022 रोजी हा व्यवहार करण्यात आला होता.

'किनारा' बंगल्यात वास्तव्य

राज कुंद्राचं खरं नाव रिपू सुदान कुंद्रा असून राज आणि शिल्पा सध्या त्यांच्या 'किनारा' नावाच्या बंगल्यात राहत आहेत. या जोडप्याचा बंगला मुंबईच्या जुहू परिसरातील गांधीग्राम रोडवर असून समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर आहे. हा बंगला एकूण 5995 चौरस फुटांवर पसरलेला असून या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी असल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT