Pushpa 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये अर्जुन कपूर झळकणार का?

Arjun Kapoor Pushpa 2: पुष्पा 2 या चित्रपटात अर्जुनच्या उपस्थितीबाबत निर्मात्याचे विधान समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa The Rise) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली आहे. पुष्पा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता प्रेक्षक पुष्पा 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 बद्दल रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. नुकतीच अभिनेत्री रश्मिका मंदण्णा हिने चित्रपटाच्या शूटिंगची माहिती शेअर केली आहे. याशिवाय या चित्रपटात अर्जुन कपूरच्या झळकणार असल्याच्या बातम्याही आल्या आहेत, ज्यावर आता निर्मात्यांचे वक्तव्य समोर आले आहे.

या चित्रपटात अर्जुन कपूर (Arjun Kapoor) दिसणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. असे म्हटले जात होते की पुष्पा 2 मध्ये अर्जुन कपूर लीड व्हिलन म्हणजेच फहद फासिलची भूमिका बदलू शकतो. अशा बातम्यांवर आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे वक्तव्य समोर आले आहे. एका मुलाखतीत पुष्पा 2 (Pushpa 2) चे निर्माते नवीन येरनेनी यांनी एक निवेदन देताना या वृत्ताचे पूर्णपणे खंडन केले आहे. तो म्हणाला की पुष्पा 2 मध्ये फक्त फहद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शूटिंग लोकेशनचीही माहिती दिली

निर्मात्याने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की पुष्पा 2 मध्ये अर्जुन कपूरची बातमी 100% खोटी आहे. पुढे चित्रपटाच्या (Movie) शूटिंगची माहितीही त्यांनी शेअर केली आहे. या महिन्यात पुष्पा 2 चे शूटिंग देखील सुरु होणार असल्याचे सांगितले. चित्रपटाचे शूटिंग 20 ते 30 तारखेदरम्यान सुरू होणार आहे. याशिवाय, चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनबद्दल बोलताना ते म्हणाले की पुष्पा 2 चे पहिले शेड्यूल हैदराबादमध्ये शूट केले जाईल. त्यानंतर जंगलात किंवा इतर ठिकाणी त्याचे शूटिंग केले जाईल.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट पुष्पा 2 ची शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. यापूर्वी, पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर (Box Office) ब्लॉकबस्टर ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT