Punjabi Singer Nirvair Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Sidhu Moose Wala च्या मृत्यूनंतर आणखी एका पंजाबी गायकाचे ऑस्ट्रेलियात निधन

Punjabi Singer Nirvair Singh: सिद्धू मुसेवाला यांच्यानंतर आता आणखी एका पंजाबी गायकाचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Punjabi Singer Nirvair Singh: सिद्धू मुसेवाला यांच्यानंतर आता आणखी एका पंजाबी गायकाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील लोकप्रिय गायक निरवैर सिंग यांना ऑस्ट्रेलियात झालेल्या भीषण कार अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार, पंजाबी गायक निरवैर सिंग यांचा मेलबर्गजवळ एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. 30 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निरवैर सेडान कारमधून जात असताना मेलबर्नजवळ त्यांच्या कारला अचानक अपघात झाला. ही घटना डिगर्स रेस्टमध्ये बुल्ला-डिगर्स रेस्ट रोडवर घडली. या संपूर्ण प्रकरणात 23 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला आरोपी करण्यात आले आहे. अपघातानंतर निरवैर ज्या कारमधून प्रवास करत होते, ती कार जीपला धडकली.

अनेक वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेले

प्रसिद्ध पंजाबी गायक निरवैर सिंग (Punjabi Singer Nirvair Singh) अनेक वर्षांपूर्वी आपले करिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला (Australia) गेले होते. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याने आणि तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. निर्वैरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या 'माय टर्न' अल्बममधील 'तेरे बिन' हे गाणे खूप गाजले होते. निरवैर हे पंजाबमधील (Punjab) कुरळी येथील रहिवासी होते. लग्नही ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाल्यानंतरच झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT