Pulkit arranges special 'Birthday' for girlfriend  Dainik Gomantak
मनोरंजन

गर्लफ्रेंड कृतीसाठी पुलकीतने अरेंज केला स्पेशल 'बर्थडे'

पुलकीतने खास अंदाजात केला लेडी लव्ह कृती खरबंदाचा 'बेस्ट बर्थडे' सेलिब्रेट.

दैनिक गोमन्तक

भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रामुख्याने कन्नड, हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये आपली छाप सोडली, आणि कमी वेळात चाहत्यांच्या मनामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी कृती खरबंदाला तिचा बॉयफ्रेंड पुलकीत सम्राट याने एक स्पेशल बर्थडे गिफ्ट दिले आहे.

बॉलिवूड मधील एक बेस्ट लव्हली कपल म्हणून ओळख असलेल्या कृती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि पुलकीत सम्राट (Pulkit Samrat) काल कृतीच्या वाढदिवसा निमित्त एकत्र आले. अभिनेत्री कृती खरबंदाने काल 32 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

कृतीने आपला हा वाढदिवस बॉयफ्रेंड पुलकीत सोबत सेलिब्रेट केल्याचे फोटो सोशलमिडीया वरती तुफान व्हायरल होत आहेत. या फोटो मध्ये पुलकीत आणि कृती एकाच ग्लास मध्ये दोन स्ट्रॉ ने पेय पिताना दिसत आहेत. त्यांच्यातील या अजब गजब केमेस्टीने चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

पुलकितने या फोटोला कॅप्शन देत लिहिले की, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह. आयुष्याला गोड आणि आंबट आठवणींमध्ये बदलून कॉकटेल बनवण्याचा मला खरोखर आनंद होतो. असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात यायचे आहेत'. पुलकीतच्या या मेसेजवर कृतीने, 'पगला! आई लव यू !' असा रिप्लाय केला.

दरवर्षी पुलकित त्याच्या लेडी लव्हचा वाढदिवस अशा प्रकारे खास बनवतो. गेल्या वाढदिवशीही पुलकितने कृतीचे असेच सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT