Priyanka chopra and Nick Jones  Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanka, Nick दुसऱ्या मुलासाठी करताहेत प्लॅन? मुलगी मालतीसाठी घेतला हा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोन्स (Nick Jones ) या वर्षी आई-बाबा झाले आहेत. दोघेही सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. नुकतेच त्यांची मुलगी मालती (Malati) सहा महिन्यांची झाली. दोघांनीही मुलीचा वाढदिवस जोरदार साजरा केला. त्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला. हे गोड दाम्पत्य सध्या दुसऱ्या मुलाचा विचार करत आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

बॉलीवूड लाईफच्या बातमीनुसार, प्रियांका आणि निक आपल्या मुलीसाठी लहान भाऊ किंवा बहिणीचा विचार करत आहेत. मुलगी मालती सही महिन्यांची झाल्यानंतरच दोघेही पुन्हा पालक बनण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या मुलीला भाऊ किंवा बहिणीचा पाठिंबा मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. निकला त्यांच्या मुलांच्या वयात जास्त अंतर असावे असे वाटत नाही. त्याची मुले जवळपास सारख्याच वयाची असावीत असे त्याला वाटते.

प्रियांका आणि निक यांनी मुलगी मालतीचे अनेक फोटो शेअर केले आहेत, मात्र अद्याप तिचा चेहरा दाखवला नाही. मालती आईवर गेली आहे की वडिलांवर हे जाणून घ्यायची चाहत्यांना उत्सुकता आहे. प्रियांका अलिकडेच लास्ट द मॅट्रिक्स रिसरेक्शनमध्ये दिसली होती. येत्या काळात ती सिटाडेलमध्ये दिसेल. बॉलिवूडमध्ये ती फरहान अख्तर दिग्दर्शित जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT