Priyanka Chopra Instagram
मनोरंजन

प्रियंका चोप्राला सेटवर जाण्यासाठी निक जोनासने दिले खास गिफ्ट

प्रियंका चोप्राने सोशल मिडियायवर एक फोटोट शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' (Citadel) चित्रपटाचे शूटिंग करत आहे. चाहत्यांसाठी सेटवरून चित्रपटाचे फोटो सतत शेअर करत आहे. अॅक्टिव्ह 'देसी गर्ल' ने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रियांकाने दिवसभराच्या कामाच्या सेल्फीनंतर एक मस्त फोटो शेअर केला आहे. या फोटोसह, एक विशेष कॅप्शन लिहून, तिने पती निक जोनासचे 'सर्वोत्कृष्ट पती' असे वर्णन केले आहे.

प्रियंका चोप्राने इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने पती निक जोनासने दिलेली खास भेट चाहत्यांना दाखवली आहे, जी मिळाल्यानंतर ती खूप आनंदी आहे. 'देसी गर्ल'ने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांका (Priyanka Chopra) कारमध्ये बसलेली दिसत आहे. गाडीवर मिसेस जोनास असेही लिहिले आहे. प्रियांकाने कारमधून मॅचिंग आउटफिट घातला आहे. फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले की, 'मला नेहमी मदत केल्याबद्दल निक जोनासचे आभार. जगातील सर्वात चांगला पती.'

प्रियांकाला सेटवर जाण्यासाठी निकने ही कार गिफ्ट केली आहे. आता ती या कारमध्ये बसून सेटवर जावू शकते. Citadel ही Amazon Prime ची मालिका आहे. प्रियांका खूप दिवसांपासून याचे शूटिंग करत आहे. यामध्ये ती 'गेम ऑफ थ्रोन्स' अभिनेता रिचर्ड मॅडेनसोबत दिसणार आहे. हा एक सायन्स फिक्शन शो आहे.

प्रियांका चोप्राच्या बॉलिवूड (Bollywood) प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत काम करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT