Prabhas Viral Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Prabhas Viral Photo: "दारु आणि सिगारेटचा हा परिणाम आहे" प्रभासच्या या व्हायरल फोटोवर अतरंगी कमेंटस

साऊथचा सुपरस्टार प्रभासचा व्हायरल फोटो पाहुन चाहत्यांना काळजीत पाडले आहे.

Rahul sadolikar

Prabhas Viral Photo: साऊथ सिनेमातील सुपरस्टार अभिनेता प्रभासचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या फोटोतील प्रभासचा बदललेला लूक पाहून त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

लवकरच 'आदिपुरुष'मध्ये दिसणारा प्रभास त्याच्या नव्या आणि बदललेल्या लूकमुळे सोशल मीडियावर खूप टीका करत आहे. हा फोटो पाहून लोक सोशल मीडियावर प्रभासची खिल्ली उडवत आहेत.

मात्र या फोटोवर प्रभास किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रजनीकांतशिवाय प्रभाससोबत शिवा राज कुमारही दिसत आहेत.

रजनीकांतसोबत प्रभासचा हा नवा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे ज्याचे कॅप्शन लिहिले आहे, 'प्रभाससोबत काय झाले? या फोटोत प्रभास भयानक दिसत आहेत. फोटोत प्रभासला पाहून युजर्स म्हणतायत - तो प्रभास असू शकत नाही. 

हा फोटो पाहून युजर्सनी विविध कमेंट्स केल्या असून, कोणीतरी फोटोशॉप केल्याचा संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे, काहींनी प्रभास चंबळ व्हॅलीच्या डाकूसारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे. काहींनी या दिसण्याचे कारणही लिहिले आहे आणि म्हटले आहे – धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे त्याच्यावर हा दुष्परिणाम होतो.

पण या या फोटोत जे दिसतंय ते सत्य नाही. खरंतर हा फोटो कोणाचा तरी प्रँक आहे आणि तो मॉर्फ करून पोस्ट करण्यात आला आहे. हे चित्र पाहून जे लोक खूप दारू प्यायल्याने त्यांची ही अवस्था झाली आहे, अशी टिप्पणी करत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहे.

प्रभासच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर प्रभास त्याच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे. याशिवाय त्यांचा 'सालार' हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांशिवाय 'प्रोजेक्ट के'चीही खूप चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: 'बर्च' पीडितांना भरपाई देण्यास लुथरा बंधू तयार; प्रस्‍ताव देणार, वकिलांनी दिली माहिती

Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

Shukraditya Rajyog 2026: 17 ऑक्टोबरपासून सोन्याचे दिवस सुरु! शुक्रादित्य राजयोग बदलणार 4 भाग्यशाली राशींचे आयुष्य; सुख, समृद्धी आणि संपत्तीची होणार बरसात

मुलांना सोशल मीडिया निर्बंध गरजेचे, करिअरसाठी 'एआय' शिकण्यास प्राधान्य द्यावे- मंत्री रोहन खंवटे

खरी कुजबुज: ही निवडणूक की दहशतीचा खेळ?

SCROLL FOR NEXT