Poster release of Naseeruddin Shah movie Ranchhod  Dainik Gomantak
मनोरंजन

नसीरुद्दीन शाह यांच्या दमदार आवाजात ''रणछोड'' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

नसीरुद्दीन शाह म्हणतात की, ''रणछोड ही एक रंजक कथा आहे.''

दैनिक गोमन्तक

''रणछोड (Rannchhod Teaser) ही एक मनोरंजक कथा आहे आणि जेव्हापासून मी त्याच्या स्क्रिप्टचा पहिला सीन वाचला तेव्हापासून माझी या चित्रपटातील आवड वाढली आहे," असे नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी सांगितले.

चित्रपटाच्या टीझरमध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या गूढ आवाजात चित्रपटातील एक आयकॉनिक संवाद ऐकायला मिळतो. अध्‍ययन सुमन (Adhyayan Suman) आणि शेरनवाज जिजिना (Shernavaz Jijina) यांनी देखील या चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे आणि चित्रपटाचे पोस्टर पाहण्यासाठीची तुमची देखील उत्सुकता नक्कीच वाढेल. रणछोड ही एका ''मोठ्या महत्त्वाकांक्षा असलेल्या तरुण आणि प्रतिभावान माणसाची कथा आहे, जो आपल्या कुटुंबाला कर्जापासून वाचवण्यासाठी भावनिक आणि गोंधळात टाकणारा प्रवास सुरू करतो.''

या चित्रपटाबद्दल बोलताना, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) म्हणताले, “रणछोड ही एक मनोरंजक कथा आहे आणि जेव्हापासून मी त्याच्या स्क्रिप्टचा पहिला सीन वाचला तेव्हापासून माझी या चित्रपटाबद्दलची आवड वाढली आहे. हा चित्रपट कौटुंबिक गोष्टींवरती केंद्रित आहे, ट्रेलर पाहिल्या नंतर तुमची देखील उत्सुकता तेवढीच वाढेल.

बलराज इराणी (Balraj Irani) आणि बुकेलिया एंटरटेनमेंट्स सोबत काम करणे, अध्यायन आणि शेरनवाझ सारख्या तरुण आणि नवीन प्रतिभावंतांना काम करताना पाहणे हा एक मनोरंजक प्रवास असणार आहे. मी त्याच्या लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट सर्व प्रेक्षकांना चित्रपटाशी शेवटपर्यंत खेळवून ठेवेल”.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT