Dhanush Dainik Gomantak
मनोरंजन

Tere Ishk Mein: 'आनंद एल राय' अन् 'धनुष' यांची जोडी पून्हा रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज

Tere Ishk Mein: आनंद एल राय आणि धनुष यांनी 'रांझना' ( 2013 ) आणि 'अतरंगी रे' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

Tere Ishk Mein: आपल्या सहज अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे धनुष हा होय. त्याच्या रांझना या सुप्रसिद्ध चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. योगायोग म्हणजे रांझना चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय आणि धुनष 'तेरे इश्क में' या चित्रपटात पून्हा एकत्र दिसणार आहेत.

रांझना हा आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी सर्वात हिट ठरलेला चित्रपट आहे. ते म्हणतात- 'रांझना माझ्या सर्वात जवळचा चित्रपट आहे, रांझनाच्या टीमबरोबर, धनुषबरोबर पुन्हा काम करण्यास मी उत्सुक आहे.'

याबरोबरच त्यांनी, तनु वेड्स मनू, अतरंगी रे, गुडलक जेरी, अ‍ॅक्शन हिरो अशा चित्रपटांचे दिग्दर्शन करत चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत.

दरम्यान, आनंद एल राय आणि धनुष यांनी 'रांझना' ( 2013 ) आणि 'अतरंगी रे' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. रांझना चित्रपटात या जोडीने लेखक हिमांशू शर्मा, गीतकार इर्शाद कामिल आणि संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासमवेत 2013 मध्ये असा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला ज्याची जादू आजही टिकून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT