Amitabh Bachchan Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan Birthday : PM नरेंद्र मोदींनी अमिताभ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; बिग बी म्हणाले...

Amitabh Bachchan Birthday : बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणार्‍यांची गर्दी उसळली आहे. ज्यावर अमिताभ बच्चन यांनी खास प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. 11 ऑक्टोबर दिवशी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो. यावेळी अमिताभ बच्चन आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणार्‍यांची गर्दी उसळली आहे. ज्यावर अमिताभ बच्चन यांनी खास प्रतिक्रिया दिली आहे.

(PM Narendra Modi gives birthday wishes to Amitabh bachchan)

पंतप्रधान मोदींनी अमिताभ बच्चन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये पीएम मोदींनी लिहिले आहे की- अमिताभ बच्चन, तुमच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

तुम्ही चित्रपट जगतातील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहात, ज्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांचे उत्स्फूर्तपणे मनोरंजन केले आहे. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच माझी सदिच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या इच्छेला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की- पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमच्या शुभेच्छांबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमचे आशीर्वादाचे शब्द माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील. या शैलीत बिग बींनी पीएम मोदींचे आभार मानले आहेत.

या कलाकारांनीही बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे ज्यांच्यासाठी प्रत्येक चित्रपट कलाकार मनापासून आदर दाखवतो. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटींनी बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपट कलाकारांमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, राजकुमार राव, मनोज वापेयी आणि कार्तिक आर्यन सारख्या सुपरस्टार्सचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT