Gauri Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Break Record : शाहरुखच्या 'पठाण'ने मोडला या चित्रपटाचा रेकॉर्ड..गौरी खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत केले कौतुक

शाहरुख खानचा पठाण नवे नवे रेकॉर्ड रचत आहे आणि यावर आता गौरी खानने आनंद व्यक्त केला आहे

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला सुरूवातीच्या काळात जो विरोध झाला तेवढा कुठल्याच चित्रपटाला झाला नसेल. काही ठिकाणी शाहरुखचे पोस्टर जाळण्यात आले तर काही ठिकाणी शाहरुख आणि अन्य कलाकारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. पण 25 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले.

पठाण रिलीज झाला त्या दरम्यान कार्तिक आर्यनपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट आले, पण पठाणच्या झंझावातात सगळे उखडले. आता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने इन्स्टाग्रामवर 'पठाण'च्या कमाईबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

गौरी खानने तिच्या शाहरुखने मिळवलेल्या या मोठ्या यशावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे. गौरीने इन्स्टाग्रामवर पठाणच्या कलेक्शनबद्दल लिहिले आहे.

गौरीने चित्रपटाच्या 1026 कोटींच्या जगभरातील कलेक्शनसह पोस्टर शेअर केले आहे आणि कॅप्शन लिहिले आहे- 'रेकॉर्ड ब्रेकिंग स्ट्रीक...#पठान.' गौरी खानच्या या पोस्टवर चाहत्यांनी जल्लोष केला आहे .

शाहरुख खानने तब्बल 4 वर्षांनंतर पठाणसोबत दमदार कमबॅक केले आहे. 'पठाण' एकामागून एक नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, भारतात आतापर्यंत 528.89 कोटींची कमाई झाली आहे.

वर्ल्डवाइड चित्रपटाच्या कलेक्शनने 1026 कोटींचा आकडा पार केला आहे. पठाण हा एकाच रिलीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT