Pamela Chopra:  Dainik Gomantak
मनोरंजन

Pamela Chopra Passes Away: दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नीचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Pamela Chopra Passes Away: दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी, राणी मुखर्जीची सासु, पामेला चोप्रा यांचा निधन झाल आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पामेला या पाश्वगायिका होत्या. इतकंच नव्हे तर त्या लेखिका आणि निर्मातीसुद्धा होत्या. पामेला यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी गुरुवारी (२० एप्रिल) सकाळी जगाचा निरोप घेतला.

पामेला या आदित्य आणि उदय चोप्रा यांच्या आई होत्या. जवळपास 11 वर्षांपूर्वी पामेला यांचे पती यश चोप्रा यांचे निधन झाले होते.

  • पामेला चोप्रा या गायिका-लेखिका-निर्मात्या होत्या

पामेला चोप्रा या पार्श्वगायिका होत्या. तसेच त्या एक चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या. पामेल चोप्रा यांनी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. यश चोप्रांच्या अनेक चित्रपटांच्या संगीतातही त्यांचा सहभाग आहे. पामेला चोप्राने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. पण त्यांनी सर्व गाणी फक्त राज यांच्या चित्रपटांसाठी गायली.

1993 मध्ये आलेला चित्रपट 'आयना'ची निर्मिती एकट्या पामेला चोप्राने केली होती. पामेलाने 1997 च्या हिट चित्रपट दिल तो पागल है ची स्क्रिप्ट देखील तिचे पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि व्यावसायिक लेखिका तनुजा चंद्रा यांच्यासोबत लिहिली होती. 

  • पामेला 'द रोमॅंटिक्स'मध्ये दिसली होती

85 वर्षांची पामेला चोप्रा अखेरची यशराजच्या माहितीपट मालिका द रोमॅंटिक्समध्ये दिसली होती. या मालिकेत तिने पती यशराजचा प्रवास आणि YRF चा वारसा यावर भरभरून चर्चा केली. 

पामेला चोप्राच्या निधनाने तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतही शांतता पसरली आहे. पामेला चोप्राच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांचे डोळे पाणावले आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT