Oscar Dainik Gomantak
मनोरंजन

Oscar: ऑस्कर सोहळ्यात यंदा भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार? जाहीर झाली यादी

Oscar: संपूर्ण जग ऑस्कर सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Oscar presenter name list released

मनोरंजनसृष्टीसाठी ऑस्कर सोहळ्याचे महत्व खूप आहे. १० मार्च २०२४ ला हा सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण जग ऑस्कर सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. आता २७ फेब्रुवारीला शोचे प्रेजेंटर कोण असणार याची यादी जाहीर केली आहे.

पहिल्या फेरीत झेंडाया, मिशेल फिफर, निकोलस केज, अल पचिनो, माहेरशाला अली, जेमी ली कर्टिस, ब्रेंडन फ्रेझर, जेसिका लाँग, मॅथ्यू मॅककोनाघी, लुपिता न्योंग, मिशेल येओ आणि सॅम रॉकवेल यांचा समावेश आहे.

असे सांगितले जात आहे की लवकरच ऑस्करकडून सादरकर्त्यांची दुसरी फेरी यादी देखील येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक स्टार दुस-या फेरीत असेल अशी चाहत्यांना आशा आहे. गेल्या वर्षी दिपीका पादुकोनने एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची प्रस्तावना दिली होती. तिचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. तर याआधी 2016 मध्ये प्रियांका चोप्राची प्रेझेंटर म्हणून निवड झाली होती.

जिमी किमेल तब्बल ३ वर्षांनी यजमान म्हणून पुनरागमन करत आहे. याआधी त्याने तीन वेळा ऑस्कर सोहळ्यात अँकर म्हणून काम केले आहे. आता यावर्षी कोणती भारतीय व्यक्ती भारताचे प्रतिनिधित्व करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, यंदा ऑस्कर पुरस्कार कोण घरी घेऊन जाणार हे पाहण्यासाठीदेखील चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात हा सोहळा १० मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टार सकाळी पाच वाजता पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Scrub Typhus Spread In goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

Sarmanas Villagers Protest: ‘वेदान्ता’ची खनिज वाहतूक रोखली! सारमानसवासीय पुन्हा आक्रमक; चार तास वाहतूक ठप्प

CENA IS BACK.... WWE चाहत्यांसाठी मोठी बातमी! जॉन सीनाच्या कमबॅकची घोषणा; RAW मध्ये दिसणार 16 वेळचा 'वर्ल्ड चॅम्पियन'

Prepaid Smart Meters: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरुपी बंद करा! अमित पाटकरांचा वीज खात्याला 15 दिवसांचा अल्टीमेटम

SCROLL FOR NEXT