Rekha- Hema Malini Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha-Hema Malini: 'क्या खूब लगती हो' ड्रीमगर्लच्या पार्टीत रेखाचा खास अंदाज

Rekha- Hema Malini: त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या वर्षांच्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये असे एका युजरने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Rekha- Hema Malini: बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. आता बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हेमामालिनी आणि रेखा दोघी पुन्हा एकदा चर्चांचा भाग बनल्या आहेत.

१६ ऑक्टोबरला हेमामालिनीने आपला ७५ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. तिच्या आनंदाच्या क्षणी तिच्या जवळच्या अनेकांनी हजेरी लावली होती. तिच्या मुली आणि धर्मेंद्रदेखील हजर होते. मात्र या सगळ्यात रेखाने लक्ष वेधून घेतले. तिने खास अंदाजात हेमामालिनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

रेखाने ड्रीमगर्लसाठी 'क्या खूब लगती हो' हे स्टेजवर गाणे हेमामालिनीला डेडिकेट केले आहे. हेमामालीनीचे हे आयकॉनिक गाणे असल्याने तिच्यासाठी ते आणखी स्पेशल होते. आता रेखा आणि हेमामालिनीला एकत्र स्टेजवर बघून सोशल मिडियावर चाहते कंमेट करत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या वर्षांच्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये असे एका युजरने म्हटले आहे.

याबरोबरच, जुही चावलानेदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. हेमामालिनी मिडियासमोर आहाना आणि ईशा बरोबर केक कापला. तिने जुहीला देखील केक भरवला. आता या सगळ्यांना एकत्र पाहून अनेक पिढ्यांना एकत्र वाढदिवस साजरा करताना पाहणे ही चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असल्याचे म्हटले जात आहे.

रेखा आणि हेमा मालिनी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अनेक चित्रपटा( Movie )त एकत्र काम केले आहे. जवळपास 9 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यामध्ये 'जान हाथेली पे', 'धर्मात्मा', 'पालकों की छांओं में' आणि 'अपने' या चित्रपटांचा समावेश आहे. रेखा( Rekha ) आता अभिनयापासून दूर असताना, हेमा मालिनी यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT