Akshay Kumar's new movie OMG 2  Instagram /@akshaykumar
मनोरंजन

OMG 2 Trailer Out: अफलातून गोष्ट अन् दमदार अभिनयानं 'ओह माय गॉड'च्या ट्रेलरनं जिंकलं मन

OMG 2 Trailer Out: पोस्टर रिलिज झाल्यापासूनच जर देवावर काही आक्षेपार्ह चित्रपटात असेल तर चित्रपट चालू देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या अक्षय कुमारच्या चित्रपटाला मिळाल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

OMG 2 Trailer Out: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट ओह माय गॉड 2 मुळे मोठ्या चर्चेत आहे.

चित्रपटात देवधर्म आणि भगवान शिवशंकर यांचा समावेश असल्याने चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाल्यापासूनच जर देवावर काही आक्षेपार्ह चित्रपटात असेल तर चित्रपट चालू देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या अक्षय कुमारच्या चित्रपटाला मिळाल्या होत्या.

आता मात्र ओह माय गॉड 2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निराळी गोष्ट आणि दमदार अभिनय यामुळे चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

पंकज त्रिपाठी कांती शरण या भूमिकेत दिसून येत असून चित्रपटाची गोष्ट या पात्राभोवती फिरताना दिसत आहे. कांती शरणच्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मानहानी झेलावी लागते.

मुलाला शाळेत सगळे हसत असतात. होणाऱ्या प्रकाराचा त्रास होऊन आपला मुलगा आत्महत्या करेल अशी भिती कांती शरणला वाटते आणि चित्रपटाच्या कहानीला सुरुवात होते. कोर्टरुममधील यामी गौतमने वकीलाच्या भूमिकेत कांती शरणच्या विरुद्ध भूमिका निभावली आहे. न्यायाधीशांबरोबर झालेले संवाद कॉमेडी असून प्रेक्षकांनी हसायला भाग पाडत आहेत.

या सगळ्यामध्ये अक्षय कुमार शिवाच्या रुपात कांती शरण यांना कशी मदत करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर शिवभक्त असलेल्या कांती शरणला न्याय मिळणार की नाही हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान चित्रपटाचा टीझर रिलिज झाल्यापासून चित्रपटावर टीका करण्यात येत होती. 27 बदल करत सेन्सॉर बोर्डाने चित्रपट रिलिज करण्यासाठी परवानगी दिली आहे.

आता 11 ऑगस्टला अक्षय कुमारचा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. महत्वाचे म्हणजे सनी देओलचे गदर 2 देखील 11 ऑगस्टलाच हा चित्रपटदेखील रिलिज होणार आहे. त्यामुळे कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

8th Pay Commission: पगारवाढीचा 'सुपर धमाका'! रिटायरमेंट फंड आणि एरियरबाबत मोठी अपडेट; बेसिक सॅलरी किती वाढणार?

SCROLL FOR NEXT