Akshay Kumar's new movie OMG 2  Instagram /@akshaykumar
मनोरंजन

OMG 2: अक्षयच्या चित्रपटाची कहानी झाली लीक ; यामी गौतम दिसणार 'या' भूमिकेत

OMG 2: होमोसेक्शुअल लोकांना पाहिल्यावर भीती वाटणे म्हणजे होमोफोबिया होय.

गोमन्तक डिजिटल टीम

OMG 2: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याचा 'ओएमजी 2' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा चित्रपटाचा टीझर रिलिज झाला तेव्हा प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले होते. आता मात्र 'ओएमजी 2' बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

अक्षय कुमारचा ओएमजी 2 चित्रपट लीक झाल्याचे म्हटले आहे. आता काही रिपोर्ट्समध्ये चित्रपटाची कथा होमोफोबियावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. होमोसेक्शुअल लोकांना पाहिल्यावर भीती वाटणे म्हणजे होमोफोबिया होय.

याबरोबरच भारतातल्या शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन बद्दल जागरुकता निर्माण करण्याभोवती, लैगिंक शिक्षण अनिवार्य करण्याभोवती ही कथा फिरणार असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय कोण कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हेदेखील समोर आल्याचे म्हटले जात आहे.

पंकज त्रिपाठी शिवभक्ताच्या भूमिकेत दिसणार असून यामी गौतम वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि अक्षय कुमार भगवान शिवशंकराच्या रुपात दिसणार असल्याचे टीझरमधून समोर आले आहे.

दरम्यान , पोस्टर आणि टीझरमधून चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणारा हा चित्रपट आता थिएटरमध्ये रिलिज होणार आहे. आता चित्रपट रिलिज झाल्यानंतरच चित्रपटाची कहानी अशीच आहे की काही वेगळी आहे हे पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करण्यासाठी 11 ऑगस्टला ओएमजी 2 रिलिज होईल तेव्हाच गदर 2 देखील रिलिज होणार असल्याने दोन्ही चित्रपटात कॅल्श होण्याची शक्यता आहे. गदर आणि ओमजी या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला प्रेम देणार आणि कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT