TMC MP Nusrat Jahan
TMC MP Nusrat Jahan Dainik Gomantak
मनोरंजन

Nusrat Jahan: 'जगातील सर्वात सुंदर खासदार', नुसरत जहाँच्या बोल्ड फोटोने चाहते घायाळ!

दैनिक गोमन्तक

TMC MP Nusrat Jahan: तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार नुसरत जहाँ या पक्षाच्या स्टार नेत्यासोबतच पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच नुसरत सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंमुळेही चर्चेत असतात. त्यांचे फोटो काही मिनिटांत व्हायरल होतात. यातच आता, त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, नुसरत जहाँ यांनी लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. फोटोंमध्ये नुसरत ठळक निळ्या रंगाच्या ब्रॅलेटमध्ये दिसत आहेत. त्यांनी त्यासोबत मॅचिंग पॅन्ट कॅरी केली आहे. नुसरत यांनी या ड्रेससोबत डायमंड नेकलेस घातले आहे.

दुसरीकडे, नुसरत यांच्या या फोटोंवर लोक खूप कमेंट करत आहेत. नुसरत यांचा हा लूक अनेक यूजर्संना आवडला आहे, तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, तुमच्यासारखी सुंदरता इतरत्र कुठेही नाही. एकाने लिहिले की, आपल्याकडे जगातील सर्वात सुंदर संसदपटू आहेत. एका युजरने नुसरत यांच्या फोटोवर कमेंट केली की, तुम्ही खासदार आहात याचा विसर पडला आहे का? असे कपडे घालणे तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला खासदार कोणी केले?

तसेच, नुसरत जहाँ अनेकदा त्यांच्या चाहत्यांसाठी असे फोटो शेअर करत असतात. नुसरत यांचं सौंदर्य पाहून त्या एका मुलाची आई असल्याचा अंदाज लावता येत नाही. पश्चिम बंगालच्या (West Bengal) या अभिनेत्रीने स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे. त्यांच्या फोटोंशिवाय नुसरत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही प्रसिद्ध आहेत. निखिल जैन आणि बंगाली अभिनेता यश दास गुप्ता यांच्यासोबतच्या नात्याने त्या चर्चेतही आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT