Arjun & Malaika Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika Arora : 'वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नॉर्मल गोष्ट'

सोशल मीडियावर अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअप बद्दल पसरत होत्या अफवा

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. तर अर्जुन आणि मलायकायांच्या ब्रेकअपबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुध्दा सुरू होत्या. आणि अखेर मलायकानं यासंदर्भात नुकतीच सोशल मीडियावर 'वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नॉर्मल गोष्ट आहे' असे म्हणत मलायका ने एक पोस्ट शेअर केली.

Arjun & Malaika

मलयाकाने सध्या शेअर केलेल्या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'वयाच्या चाळीशीत प्रेम करणं या गोष्टीला आपण आता नॉर्मलाइज केलं पाहिजे. ही गोष्ट नॉर्मल आहे. वय 30 झाल्यानंतर नव्या गोष्टी शोधल्या पाहिजेत तर 50 व्या वर्षी नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आपलं आयुष्य अगदी वयाच्या 25 व्या वर्षी संपवणं योग्य नाही. त्यामुळे असे विचार करणं बंद करा.'

काही दिवसांपासून सोशल मीडियावर अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअप बद्दल अफवा पसरत होत्या. त्याबद्दल अर्जुननं पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये अर्जुननं लिहिले की, 'अशा अफवांना इथं जागा नाही. सर्वांनी सुरक्षित राहा. सर्वांचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करा. सर्वांना प्रेम.' आणि अखेर अफवांना विराम दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT