India's best dancer Dainik Gomantak
मनोरंजन

नोरा-टेरेन्सचा हॉट डान्सने लावली स्टेजला आग!

अभिनेत्रीचे चाहते व्हिडिओवर हार्ट इमोजी आणि फायर इमोजीने कमेंट करून तिच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत आणि तिच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक करत आहेत.

दैनिक गोमन्तक

प्रेक्षक नोरला 'इंडियाज बेस्ट डान्सर' (Indias Best Dancer) च्या मंचावर पाहुणी म्हणून पाहतील. जिथे ती कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत (Terence Lewis) धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे.

नोरा फतेही (Nora Fatehi) कॅनेडियन अभिनेत्री (Canadian actress) , मॉडेल, नृत्यांगना, गायिका आणि निर्माती जी भारतीय चित्रपट ओळखली जाते. नोरा आयटम सॉंग (Item Song) मध्ये दिसुन येते तिच्या जबरदस्त मूव्ह्सने लोकांना भुरळ पाडते. आपल्या नृत्यकौशल्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक विशेष स्थान निर्माण केले आहे. डान्स रियलिटी शोमध्ये नोरा खुपदा जज म्हणूनही दिसुन आली आहे. यावेळी प्रेक्षक तिला 'इंडियाज बेस्ट डान्सर' (Indias Best Dancer) च्या मंचावर पाहुणी म्हणून पाहतील. जिथे ती कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत (Terence Lewis) धमाकेदार डान्स करताना चापत्यांना दिसणार आहे.

सोनी टीव्हीने या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडिया वरती पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तुम्हांला नोरा आणि टेरेन्स श्रीदेवी यांच्या हिट, 'काटे नही कटते' या गाण्यावरती धमाकेदार डान्स करताना दिसून येत आहेत. अभिनेत्रीचे चाहते व्हिडिओवर हार्ट इमोजी आणि फायर इमोजीने कमेंट करून तिच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत आणि तिच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक करत आहेत.

यामध्ये टेरेन्स आणि नोरा फारच हॉट अंदाजात दिसून येत आहेत. याआधीही डान्स रियालिटी शोमध्ये नोरा आणि टेरेन्स खुपदा डान्स करताना दिसुन आले आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना फारच पसंत पडली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेकवेळा चाहत्यांनकडुन टेरेन्स नोरावर फिदा असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान दोघांचा डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नोराच्या आणि टेरेन्सच्या ह्या व्हिडिओ मुळे नेटकऱ्यांना वेढ लागले आहे. ज्यामध्ये तिने थाई हाय स्कर्टसह क्रॉप टॉप घातला आहे. या स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेत्री नोरा अभिनेता चंकी पांडे, नीलम कोठारी आणि दिव्या खोसला कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहे. नोराच्या बोल्ड डान्सचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून डान्ससोबतच मजेदार व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

'इंडियाज बेस्ट डान्सर' (India's best dancer) या शोचा दुसरा सीझनही पहिल्या सीझनप्रमाणेच प्रेक्षकांकडुन पसंत केला जात आहे. यावेळीही शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक दिसून येणार आहेत. स्पर्धक आपल्या धमाकेदार डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना तसेच जजला चकित करत आहेत. गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्यासोबत मलायका अरोरा (Malaika Arora) या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

SCROLL FOR NEXT