Avatar:The Way Of Water Dainik Gomantak
मनोरंजन

Avatar:The Way Of Water चा नवा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज

'द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाचा नवीन ट्रेलर रिलीज झाला आहे, जो पहिल्या भागापेक्षा खूपच दमदार आहे.

दैनिक गोमन्तक

जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 2009 चा हॉलिवूड चित्रपट 'अवतार' (Avatar) हा जगभरातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. पहिल्या भागानंतर जगभरातील प्रेक्षक त्याच्या सीक्वलची वाट पाहत आहेत, जो लवकरच पूर्ण होणार आहे. निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चा नवीन ट्रेलर रिलीज केला आहे.

'अवतार' रिलीज होऊन 13 वर्षांनी त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' रिलीज होणार आहे. ज्यामध्ये पहिल्या भागापासून कथा दाखवण्यात येणार आहे. 'सुली कुटुंब' त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवतात आणि हे कुटुंब स्वतःला वाचवण्यासाठी काय करते हे दाखवले जाईल.

  • जबरदस्त ट्रेलर

2 नोव्हेंबर रोजी 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चा नवीन ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाला. त्याचबरोबर यात दाखवण्यात आलेले व्हीएफएक्स अतिशय नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक आहे. हा ट्रेलर पाहता, पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक प्रेक्षणीय असणार आहे, हे कळते.

  • या दिवशी रिलीज होईल

जेम्स कॅमेरॉनच्या या चित्रपटाबाबत (Movie) बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती, तर आता समोर आलेल्या ट्रेलरने लोकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर, 'अवतार: द वे ऑफ वॉटर' 16 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

  • या भाषांमध्ये होणार रिलीज

'अवतार: द वे ऑफ वॉटर' भारतात इंग्रजी आणि हिंदी तसेच तमिळ, तेलगू आणि मल्याळमसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT