Aryan Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

एनसीबीची कारवाई खरच फर्जीवाडा? पंचाचा मोठा गौफ्यस्फोट

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या आर्यन खान प्रकरणामध्ये (Aryan Khan case) अनेक मोठे खुलासे समोर येऊ लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या आर्यन खान प्रकरणामध्ये (Aryan Khan case) अनेक मोठे खुलासे समोर येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना 8 कोटी देण्यात येणार होते. मात्र जेव्हा सर्व काही ठरणार होते तेव्हा शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने (Pooja Dadlani) फोन उचलणे बंद केले. यानंतरच आर्यन खानने ड्रग्ज घेतल्याच्या बातम्या (Aryan Khan Case) प्रसारमाध्यमांमध्ये वेगाने पसरु लागल्या. अर्थातच जर शाहरुख खानने (Shahrukh Khan) 18 कोटी रुपये दिले असते तर आर्यन खानचे प्रकरण दाबले गेले असते. त्याचबरोबर किरण गोसावी (K.P.Gosavi) याचा अंगरक्षक प्रभाकर साळी (Prabhakar Sali), ज्याचा फोटो आर्यन खानसोबत सेल्फी घेताना व्हायरल झाला होता, त्याने यासंबंधीचा मोठा खुलासा केला आहे.

प्रभाकर साळी नावाच्या या बॉडीगार्डने एफिडेविट तयार केले आहे, ज्यात किरण गोसावी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी सॅम डिसूझाच्या माध्यमातून 25 कोटी घेण्याबाबत बोलत होता. दरम्यान शेवटी 18 कोटींवर सेटलमेंट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी किरण गोसावी याने सहमती दर्शवली आहे. किरण पुढे म्हणाला की, या 18 कोटी पैकी 8 कोटी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना द्यावे लागतील, मात्र त्यानंतर पूजा ददलानी फोन उचलणे बंद केले होते, याचाही एफिडेविटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

छापेमारीनंतर पूजा ददलानी, गोसावी आणि सॅम यांनी 15 मिनिटे केले संभाषण

प्रभाकर साळी यांनी दावा केला आहे की, मी गोसावी आणि सॅम डिसूझा यांच्यातील संवाद ऐकला होता. यामध्ये गोसावी याने 25 कोटींनंतर सौदेबाजी करुन 18 कोटींचा सौदा निकाली काढण्यास सांगितले होते. यापैकी 8 कोटी समीर वानखेडे यांना द्यावे लागतील असेही गोसावीच्या ऐकण्यात आले होते. पुढे प्रभाकरने असेही म्हटले आहे की, क्रूझमध्ये एनसीबीच्या छाप्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी, किरण गोसावी आणि सॅम डिसूझा यांनी निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये 15 मिनिटांचे संभाषण केले.

NCB चे उपसंचालक अशोक जैन स्पष्ट करतील

समीर वानखेडे यांनी म्हटले की, एनसीबीचे उपसंचालक अशोक जैन संपूर्ण प्रकरणावर उत्तर देतील. दुसरीकडे माध्यमांसमोर येत, खळबळजनक आरोप करत व्हिडिओ जारी करत कोर्टात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. तसेच त्याने समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील सांगितले आहे.

प्रभाकरच्या वहिनीचा आरोप-पंच साक्षीदार बनवण्यासाठी जबरदस्तीने सही केली

प्रभाकर साळीने असेही सांगितले की, त्याला पंच साक्षीदार बनवण्यासाठी समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 9 ते 10 पानांवर त्याची सही घेतली जी रिक्त पृष्ठे होती. तेव्हा हाच प्रश्न पडतो की, वसुलीच्या प्रकरणात समीर वानखेडे यांचा किती सहभाग आहे. दुसरीकडे पैसे न मिळाल्यामुळे आर्यन खानला अटक झाली तर नाही ना, यासंबंधीचे तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

जिवाची भीतीने याबद्दल सांगितले नाही- प्रभाकर साळी

दरम्यान, प्रश्न असाही की, जर आर्यन खानचे नाव सार्वजनिक करणे इतके सोपे होते, तर पूजा ददलानीने फोन उचलणे का थांबवले? जर शाहरुख खानसाठी 18 कोटी ही मोठी रक्कम होती, आणि जर मुलाची प्रतिष्ठा वाचवली जात असती तर, पूजा ददलानीला केपी गोसावी आणि समीर वानखेडे यांच्याशी करार निश्चित करण्यापासून कोणी रोखले? मग प्रश्न असाही उद्भवतो की, प्रभाकर वहिनींनी ही माहिती आधी का शेअर केली नाही? मात्र, प्रभाकर साळी याने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे की, मला माझ्या जीवाची भीती वाटते, त्यामुळे आजपर्यंत याबद्दल सांगितले नव्हते. तथापि, प्रभाकर आता आयुष्याची भीती का वाटत नाही याबद्दल मात्र सांगत नाही. आर्यन खानशी संबंधित ड्रग प्रकरणी दररोज नव नवे खुलासे समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT