Tiku Weds Sheru Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Tiku Weds Sheru Trailer : नवाजुद्दीनच्या बहुचर्चित 'टीकू वेड्स शेरू'चं ट्रेलर रिलीज

कंगना रणैात निर्मित टीकू वेड्स शेरू या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन कंगना रणौत वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. वेगवेगळ्या विषयांवर घेतलेल्या स्पष्ट पण वाद निर्माण करणाऱ्या भूमीकेमुळे कंगनाची चर्चा होत असते ;पण आता कंगनाची चर्चा होण्याचं कारण वेगळं आहे. काही दिवस कंगना रनौतची निर्मिती असलेल्या ‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमाची बरीच चर्चा होती. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर, या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट कंगना साठी आणि मनोरंजन विश्वासाठी देखील अत्यंत महत्वाचा मानला गेला कारण निर्माती म्हणून ही कंगनाची पहिली निर्मिती आहे. आता अभिनयासोबतच ती निर्मातीही झाली आहे. त्यामुळे हा सिनेमा काय वेगळा विषय घेऊन येणार याची उत्सुकता होती.

नवाज आणि अवनीत कौर मुख्य भूमीकेत

या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर प्रमुख भूमिकेत आहेत. नवाजच्या नावाने या चित्रपटाची अधिकच चर्चा रंगली. अखेर 'टीकू वेड्स शेरू'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

या सिनेमातून एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चाळीशीतला नवाज आणि विशीतली अवनीत यांची भन्नाट केमिस्ट्री रंगलेली दिसते. विशेष म्हणजे नवाजने नेहमीप्रमाणेच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री अवनीत कौरचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तिचा अभिनय आपले लक्ष वेधून घेतो.

टीकू वेड्स शेरूची गोष्ट

‘टीकू वेड्स शेरू’या सिनेमाची कथा टीकू आणि शेरू यांच्या अजब-गजब लव्हस्टोरीची आहे. यामध्ये टीकूचं पात्र अवनीत कौर आणि शेरूचं पात्र नवाजुद्दीन सिद्दीकीनं (nawazuddin siddiqui) साकारलं आहे. शेरू मुंबईतील एक साधा ज्यूनिअर आर्टिस्ट असतो जो स्वत:ला सुपरस्टार समजतो.

तर शेरूच्या लग्नासाठी मुलगी बघितली जाते तीही अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहत असते. ती म्हणजे टिकू आणि केवळ मुंबईला जाण्यासाठी टीकू शेरूसोबत लग्न करण्यासाठी तयार होते. पुढे मुंबईत आल्यानंतर आपलं अभिनेत्री होण्याचं स्नप्न पूर्ण करण्यासाठी ती घरातून पळून जाते. आता पुढे नेमकं काय होतं, तेच आपल्याला चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही तर तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 23 जून रोजी प्राइम व्हिडीओवर तो प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडची क्विन आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना रनौतने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासारखं असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT