Mrunal Thakur Wedding Rumors Dainik Gomantak
मनोरंजन

Mrunal Thakur Wedding: "योग्य जोडीदाराच्या शोधात", लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, धनुषसोबतच्या अफेअरवरही दिलं उत्तर

Mrunal Thakur Wedding Rumors: बॉलिवूडपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे.

Sameer Amunekar

बॉलिवूडपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. सोशल मीडियावर सातत्याने तिच्या लग्नाबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना, मृणालने आता स्वतःच या विषयावर स्पष्ट भाष्य केले आहे. "मला लग्न करायला आवडेल, पण त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य जोडीदार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे," असे मृणालने एका मुलाखतीत म्हटले आहे.

मृणालचे स्पष्टीकरण

गेल्या काही काळापासून दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि मृणाल ठाकूर एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. मात्र, मृणालने या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत त्या फेटाळून लावल्या आहेत.

लग्नाबद्दल बोलताना ती म्हणाली की, आजच्या काळात लग्नाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी लग्नाची कारणे वेगळी असायची, पण आता लोक मानसिक ओढ आणि खऱ्या नात्याला प्राधान्य देतात. ज्या दिवशी मला माझा 'मिस्टर राईट' मिळेल, त्या दिवशी मी स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी देईन, असेही तिने स्पष्ट केले.

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसणार मृणाल

मृणाल सध्या तिच्या आगामी 'दो दिवाने शहर में' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केली असून रवी उदयवार यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाकडून मृणालला मोठ्या अपेक्षा आहेत.

'डकैत' मधून प्रेक्षकांच्या भेटीला

'दो दिवाने शहर में' नंतर मृणाल ठाकूर दाक्षिणात्य अभिनेता आदिवी शेषसोबत 'डकैत' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक रोमँटिक-ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून, तो १० एप्रिल २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. एका बाजूला लग्नाच्या चर्चा आणि दुसऱ्या बाजूला बिग बजेट चित्रपटांची रांग, यामुळे मृणाल ठाकूर सध्या सिनेसृष्टीत 'टॉक ऑफ द टाऊन' ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT