‘सेमखोर’ या चित्रपटाने होणार इंडियन पॅनोरामाचे उद्घाटन Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 2021: ‘सेमखोर’ या चित्रपटाने होणार उद्घाटन

दिमसा भाषेत तयार झालेला हा पहिलाच चित्रपट, ‘सेमखोर’, इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागाच्या उद्‍घाटनाचा चित्रपट असणार आहे.

दैनिक गोमन्तक

'सेमखोर ’च्या रिवाजानुसार जेव्हा बाळंतपणात एखादी स्त्री मृत्यू पावते तेव्हा तिच्याबरोबर तिचे नवजात मूलही जिवंतपणे दफन केले जाते. सेमखोर या सिनेमाच्या नायिकेने आपल्या मुलीचे, मुरीचे, लग्न तिच्या अकराव्या वर्षी करून दिले आहे. दुर्दैवाने मुरी मुलीला जन्म देताना मरण पावते. ज्या समाजात एका स्त्रीला तोंड उघडायचा अधिकार नसतो तिथे एका नवजात अर्भकाच्या जीवनात या चित्रपटाची नायिका ज्याऱ्हेने प्रकाश घेऊन येते ती ‘सेमखोर’ साठी एक नवीन पहाट असते.

दिमसा भाषेत तयार झालेला हा पहिलाच चित्रपट, ‘सेमखोर’, इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागाच्या उद्‍घाटनाचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अ‍ॅमी बारुआ यांनी केले आहे. अ‍ॅमी बारुआ या आसामच्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. इंडियन पॅनोरामाच्या नॉन फिचर विभागात निवड झालेला ‘वेद... दि व्हिजनरी’ हा लघुपट त्या विभागासाठी उद्‍घाटनाचा चित्रपट असेल. राजीव प्रकाश हे या लघुपटाचे दिग्दर्शक आहेत

यंदा इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा या विभागासाठी 221 प्रवेशिका आल्या होत्या त्यातून 25 चित्रपटांची निवड या विभागासाठी करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते एस. व्ही. राजेंद्र सिंग बाबू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या असलेल्या 22 सदस्य ज्युरी मंडळाने हे चित्रपट निवडले आहेत.

- सतिंदर मोहन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT