Mouni Roy Dainik Gomantak
मनोरंजन

बॉयफ्रेंड सूरज सोबत मौनी रॉय करणार गोव्यात लग्न

मौनी रॉयचे शुभ मंगल गोव्यात होणार अशी चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

अनेक कलाकारांनी 2021 मध्ये लग्न करून आपले घर स्थायिक केले आहे. या वर्षीही अनेक कलाकार लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या यादीत मौनी रॉयचे नाव आहे. आपल्या स्टाइलने सर्वांना वेड लावणारी मौनी रॉय (Mouni Roy) आता लाखो लोकांचे मने तोडून लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या वर्षभरापासून मौनीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मौनी सध्या दुबईस्थित (Dubai) बॉयफ्रेंड सूरजला डेट करत आहे. यापूर्वी बातम्या येत होत्या की मौनी दुबईत लग्न करणार आहे. पण आता लग्नाबबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

मौनी रॉय (Mouni Roy) 27 जानेवारीला गोव्यात (Goa) लग्न करणार आहे अशी माहिती एका वृत्ताकडून मिळाली आहे. लग्नासाठी पंचतारीक रिसॉर्ट बूक करण्यात आले आहे. पाहुण्याना लग्नाची आमंत्रणे पाठवली आहेत. शिवाय याबद्दल कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे. सर्व पाहुण्यांना लसीकरण (Vaccine) प्रमाणपत्र सोबत आणण्यास सांगितले आहे.

लग्नानंतर दोघेही 28 जानेवारीला डान्स पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीमध्ये (Party) फक्त दोन्ही कुटुंब आणि मित्रपरिवार असतील. ज्या सेलिब्रिटींना लग्नाचे आमंत्रण मिळाले आहे त्यात करण जोहर, एकता कपूर, मनीष मल्होत्रा आणि अशक्य आश्का गोराडिया यांचा समावेश आहे. आतापर्यंत या सेलेब्सची नावे लग्नासाठी कन्फर्म झाले आहेत. मौनीने गोव्यात (Goa) बॅचलर पार्टी केली होती ज्यामध्ये तिने तिच्या गर्ल गॅंगसोबत खूप मस्ती केली होती.मौनीने आपल्या करिअरची सुरुवात सास भी कभी बहू थी या मालिकेतून केली. यांनंतर तिने कस्तुरी, दो सहेलिया, देवों के देव महादेव, नागिन, नागिन 2 मध्ये काम केले आहे. यानंतर मौनीने बॉलीवुड (Bollywood) चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिने रोमियो अकबर वॉल्टर, मेड इन चायना, लंडन कॉन्फिडेन्शियल, वेल्ले या चित्रपटात काम केले.आतात मौनी ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT