'निवासा'चा प्रवास  Dainik Gomantak
मनोरंजन

'निवास'चा प्रवास

मेहुल अगाजालिखित आणि दिग्दर्शित (Directed) ’निवास’ याच रामरावाची गोष्ट सांगतो.

दैनिक गोमन्तक

स्मरण आणि विस्मरणाच्या काठावर अखंड आयुष्य निघून जाते. जे आठवते आहे ते सत्य, किजे विसरून गेलो ते सत्य? काहीच कळत नसते सलगपणे. आणि तसाही सलग पण असतोच कुठे नित्याच्या जगण्यात? सगळेच कसे असलग. असंबद्ध. आणि आपल्याला ओढ अनिर्बंधाची. जगणे असेच पाहिजे असते आपल्याला अनिर्बध. पण आपणच त्याला घालतो बांध. मग जेव्हा वाहू लागतो तो बांध दुथडीभरून. तेव्हा आपण रिते होऊन जातो... हळूहळू.. आणि घेऊ लागतो शोध... जागता - अजागता. शोध सुरु असतो स्वतःचा. काल, आज आणि उद्यासुद्धा. तरीसुद्धा आपण आपल्याला सापडतोच असे नाही. आपण हरवतो आपल्यातच. आपण आपल्याच प्रेमात पडतो. आपण आपल्यावरच राग करतो. आपलाच द्वेष करू लागतो प्रसंगानुरूप. पण तरीही आपण हे सगळे करत असलो तरी, आपणच हे सगळे असतो असे नाही. कारण हे आपण कधी करतो? कसे करतो? का करतो? याचे ठोस उत्तर कधीही मिळत नसते. उत्तरे मिळत नाहीत, मग आपण उत्तरांच्या शोधात निघतो. दुरात कुठेतरी उत्तरे मिळू लागतात आणि नेमके आपण तेंव्हा आपले प्रश्नच हरवून जातो. कारण प्रश्नांसाठी उत्तरे की उत्तरांसाठी प्रश्न हे द्वंद्व सुरुच असते आजन्म. चुकून कोणीतरी वाट वाकडी करून जात असेल आयुष्याच्या वाटेला... रामरावसारखा.

मेहुल अगाजालिखित आणि दिग्दर्शित (Directed) ’निवास’ याच रामरावाची गोष्ट सांगतो. त्याला सगळे आठवते आणि तो सगळे विसरतो देखील. तो निर्लेप आहे. अलिप्त आहे. पण तो सच्चा आहे. भौतिकांमध्ये गुंतलेला आहे. पण ती निसरगाठ आहे. जगण्याच्या कोणत्याही क्षणी तो गाठ सोडून मुक्त होऊ शकतो. आणि तसा तो होतो देखील. कारण त्याचे या सगळ्यात नसणे हे त्याचे असणे आहे. त्याचे असणे त्याला सिद्ध करावे लागत नाही. तो कुठेच नसतो. तरीही तो सगळीकडे असतो. तो श्रांत पहुडलेल्या बुद्धासारखा आहे. तो संसारात आहे. पण जेव्हा त्याला कळते की, आपल्या नसल्याने कोणाला काही फरक पडत नाही. तेव्हा तो निमिषाचाही विचार न करता सगळे पाश तोडतो. सायबू त्याचा सखा आहे. मित्र आहे. आत्मीय आहे. आणि त्याला स्वतःकडे नेणारा रस्ताही (Road) आहे. विरह वाईटच. पण त्यातूनच जगण्याची नवी आरोही सुचत जाते.

सायबू या आरोहीच पहिला ’सा’ वाटत राहतो. मेहुल अगाजाने अत्यंत तन्मयतेने ही गोष्ट आहे. त्याचा हा पहिलाच सिनेमा (Movie) आहे. पण पहिलेपणाची कोणतीही नामोनिशाणी सिनेमात (Movie) दिसत नाही. एवढे त्याची या कथेवर आणि सिनेमाच्या (Movie) तंत्रावर हुकूमत जाणवते. सयाजी शिंदेंसारख्या दिग्गज अभिनेत्यांकडून (Actor) मेहुलने एक वेगळीच भूमिका (Role) साकारून घेतली आहे. पहिल्या फ्रेमपासून अंडरप्ले असलेली ही भूमिका सयाजी शिंदे यांनी अफलातून केली आहे. आजवर वेगवेगळ्या सिनेमांतून (Movie) साकारलेल्या भूमिका आणि ‘निवास’ (Nivas) मधील ‘रामराव’ यांच्यामध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. एवढ्या संयमित अभिनयासाठी केवळ साधनाच लागते. आणि त्यांच्या या साधनेमुळेच रसिकांनाही (Fans) समाधीचा अनुभव मिळत राहतो.

- किशोर अर्जुन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT