Marathi actress Nishigandha Wad apologized 
मनोरंजन

अभिनेत्री निशिगंधा वाड यांची 'दिलगिरी'

दैनिक गोमन्तक

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतल्या प्रख्यात अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या निशिगंधा वाड या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. त्यांच्या वादात अडकण्याचे मुख्य कारण म्हणजे एलजीबीटी समूहा विरोधात त्यांनी वक्तव्य केले. या कारणावरून त्या ट्रोल झाल्या आहे. त्यांना मोठया प्रमाणावर विरोध झाल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या वक्तव्याची माफीही मागितली आहे. अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवर 'दिल के करीब' या मुलाखतीतच्या कार्यक्रमाअंतर्गत सुलेखा तळवलकर यांनी निशिगंधा वाड यांची मुलाखत घेतली होती आणि हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता.

या मुलाखतीत वाड या एलजीबीटी याविषयावर भाष्य करताना त्यातून वाद निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचे दिसून आले आहे. त्यावरून संबंधित समलैंगिक संबंधांसंदर्भात त्यांची भूमिका मांडली. यानंतर त्यांच्यावर टीका झाली आहे. त्यातील या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आपलंच कौतुक करण्यापेक्षा जरा वेगळ्या विषयावर बोलू, असं निशिगंधा म्हणाल्या, 'मला ना निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडा पचनी नाही पडत समलिंगी संबंधाबाबत माझं वैयक्तिक मत थोडं वेगळं आहे. माझ्या मुलीला मी या विषयावर बोललेलं आवडत नाही. आताच्या पिढीला असं वाटतं की हाऊ कॅन यू कॉन्ट्रॅडिक्ट? (तुम्ही विरोधी मत कसं मांडू शकता) तुम्ही नॉर्मल नाहीत का?. प्रत्येकाला वैयक्तिक आवडीनिवडी प्राधान्य आहे. प्रत्येकाला निवडीचा अधिकार आहे, पण उपचारही आहेत की...' असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आपण अशा लोकांबद्दल आपण मानवी हक्कांबद्दल बोलतो. मला सगळ्या गोष्टी कळतायत असं नाही. पण अशा जोडप्यानं एखादं मुल दत्तक घेतलं तरी त्या मुलाच्या मानवी, हक्कांचं काय? हा प्रश्नच उभा राहतोच ना?

समजा अशा कुटूंबाने एखाद्या मुलाला दत्तक घेतले तर त्या मुलांच्या मानवी हक्कांचं काय? त्यांना ह्यूमन राईट्सबद्दल समजेपर्यंत ते गोंधळेली नसतील का? शेवटी त्यांच्या वक्तव्यावरून निशिगंधा यांनी माफी मागितली आहे. 'एलजीबीटीक्यू समूह किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळं कोणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते', असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. 'मी सामाजिक क्षेत्रात काम करतेय तृतीयपंथींसोबतही काम चालतं. मला कोणावरही आरोप करण्याचा हेतू नव्हता. गे असणं, लेस्बियन असणं ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यासंदर्भात मी बोलू शकत नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्ती देखील नाही, असं डॉ. निशिगंधा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT