Marathi Actor Aastad Kale slap politician on covid 19 situation in india Social Media Post Viral
Marathi Actor Aastad Kale slap politician on covid 19 situation in india Social Media Post Viral  
मनोरंजन

''अरे हाड! नागडा देश, नागडं सरकार''

गोमंतक वृत्तसेवा

देशात कोरोना संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक मूलभूत सुविंधाचा तुटवडा भासू लागला आहे. या मूलभूत सुविधांच्या अभावी अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. सर्वजण सरकार आणि राजकारणी यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान मराठी अभिनेता अस्ताद काळे (Aastad Kale) याने देखील सरकार आणि राज्यातील राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. (Marathi Actor Aastad Kale slap politician on covid 19 situation in india Social Media Post Viral) 

अभिनेता अस्तादने त्याच्या सोशल मिडियावरील इन्स्टाग्राम आकांऊटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारणी, सरकार, केंद्र सरकार यांना सवाल केला आहे. प्रश्न विचारायचे आहे, सत्व जपायचे आहे. कदाचित या बिकट परिस्थितीमध्ये जीव गमावावा लागू शकतो. कुठे काही बोलायचं. अरे हाड. आम्ही प्रश्न विचारणार. सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला. उत्तर न देता आम्हाला गप्प करु बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार आहे. नागडे राजकारणी... नागडा देश.. नागडं सरकार.. निरोप घेतो, असं म्हटलं आहे.

अभिनेता आस्ताद काळेची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी कंमेट केल्या आहेत. एका यूजरने तर ‘हे बरोबर आहे’ असं म्हटलं आहे.

आस्ताद 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेमध्ये काम करताना दिसत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. ही मालिका कलर्स मराठी वर चालू होती. आस्ताद लवकरच एका वेब सिरीजमध्ये देखील दिसणार आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

SCROLL FOR NEXT