Manoj Bajpayee Dainik Gomantak
मनोरंजन

Manoj Bajpayee Upcoming Film: मनोज वाजपेयी 'सिर्फ एक बंदा काफी है'

आगामी कोर्टरूम ड्रामा चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर

Akshay Nirmale

Manoj Bajpayee Upcoming Film: तीन दशकांहून अधिक काळात अनेक संस्मरणीय पात्रे साकारल्यानंतर, मनोज वाजपेयी नुकत्याच पूर्ण झालेल्या त्यांचा आगामी चित्रपट 'बंदा'सह पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी कोर्टरूम ड्रामा चित्रपट 'बंदा'च्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले आहे.

चित्रपटाच्या या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरमध्ये मनोज वाजपेयी चष्म्यासह एका इंटेन्स लूकमध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटाचे शूटिंग जोधपूर आणि मुंबईमध्ये झाले असून, हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या शेवटच्या सीनचे शूटिंग करताना सर्व कलाकार आणि क्रू यांनी पॉवरहाऊस अभिनेता मनोज वाजपेयी याला स्टँडिंग ओव्हेशन दिले होते. हा एक तीव्र कोर्टरूम सीन होता. यानंतर केक कापून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच, या बहुप्रतिक्षित चित्रपटात केलेल्या कामाबद्दल संपूर्ण टीमने कृतज्ञतादेखील व्यक्त केली.

झी स्टुडिओज आणि भानुशाली स्टुडिओज लिमिटेड प्रस्तुत तसेच अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित सुपर एस वर्मा यांचा आगामी कोर्टरूम ड्रामा 'बंदा'ची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानी केली असून जुही पारेख मेहता यांनी सह-निर्मिती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT