Actor Innocent Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Actor Innocent Passes Away: मृत्यूचे भय संपत नाही...आता इंडस्ट्रीतल्या या मल्याळम अभिनेत्याने घेतला जगाला निरोप

गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीवर मृत्यूचं सावट असल्याचं दिसतंय

Rahul sadolikar

Actor Innocent Passes Away: चित्रपटसृष्टीवर दाटलेले दु:खाचे ढग संपण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला. नुकतीच भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या कथित आत्महत्येच्या बातमीने धक्का बसला. 

आता मल्याळम अभिनेता आणि माजी खासदार इनोसेंट यांचे निधन झाले आहे. 75 वर्षीय अभिनेत्याने 26 मार्च रोजी रात्री 10.30 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार , श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे इनोसेंट यांना ३ मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याच्या शरीरातील अनेक अवयव काम करणे बंद झाले होते. त्यामुळे इनोसेंट यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

इनोसेंट यांना घशात संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना रुग्णालयातील आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत इनोसेंट यांना तीन वेळा कोरोना झाला होता, त्यामुळे त्याची प्रकृती आणखी खालावली. 

ते एक कॅन्सर सर्व्हायव्हरही होते. काही वर्षांपूर्वीच त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, नंतर ते सावरले. पण शरीर खूपच अशक्त झाले होते.

इनोसेंट यांची मल्याळम सिनेमात दीर्घ कारकीर्द होती. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 700 हून अधिक चित्रपट केले. ते मल्याळम सिनेमातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार मानले जात होते. 

मात्र, इनोसेंट अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतही दिसला. त्यांनी 1972 मध्ये 'नृत्यशाला' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यांचं नाव घराघरात झाले. तेव्हापासून ते सतत चित्रपटांमध्ये सक्रिय होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT