Malika Arora Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Malika Arora Viral Video : चाहत्यांच्या गर्दीत गुदमरली छैय्या छैय्या गर्ल...मलायका अरोराचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

छैय्या छैय्या गर्ल मलाईका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

Malaika Arora Viral Video: अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना वेड लावत असते.  

फिटनेससोबतच ४९ वर्षीय मलायका तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही प्रसिद्ध आहे. भलेही तिने जास्त चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले नसेल, पण 'छैय्या-छैय्या' गर्लने तिच्या खास स्टाईलने सर्वांची मनं जिंकली आहेत हे मात्र नक्की.

मलायका जेव्हा जेव्हा रॅम्पवर येते तेव्हा ती आग लावते. नुकतीच ही अभिनेत्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईत पोहोचली होती. या कार्यक्रमात ती खूपच सुंदर दिसत होती. 

कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी पोहोचलेल्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईत पोहोचलेली मलायका अरोरा नेहमीप्रमाणेच काळ्या रंगाच्या चमकदार गाऊनमध्ये अतिशय सुंदर अवतारात दिसली. 

या कार्यक्रमात तिने सर्वप्रथम माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर चाहत्यांची भेट घेतली. मलायका अरोराने चाहत्यांना निराश केले नाही आणि सर्वांसोबत सेल्फी क्लिक केले.

मात्र, यावेळी मलायका एक-दोन चाहत्यांसोबत सेल्फी काढत असताना हळूहळू तिथे गर्दी वाढत गेली. त्यावेळी अभिनेत्रीसोबत सुरक्षा रक्षक उपस्थित होते, मात्र चाहत्यांच्या गर्दीने मलायकाला अशा प्रकारे घेरले की तिला चाहत्यांमधून बाहेर पडणे कठीण झाले.

या व्हिडिओमध्ये, चाहते मलायकासोबत सेल्फी घेण्यासाठी तिचे फॅन्स खूप उत्सुक होते आणि त्यापैकी एकाने मलायकाला धक्काबुक्कीही केली. मात्र, वाढती गर्दी पाहून मलायका चांगलीच अस्वस्थ झाली आणि सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीला तिला धक्काबुक्की करू नका आणि काळजी घ्या असं सांगितलं.

 मलायकाने तिच्या शोमध्ये आधीच खुलासा केला आहे की ती पापाराझींमुळे खूप नाराज होती, परंतु तिने आजपर्यंत कोणालाही फटकारले नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

युजरने कमेंट करताना लिहिले की, 'मलायका मॅडमकडे तिचा बॉडीगार्ड असतानाही माझ्या लक्षात आले की ती त्यांनी चाहत्यांशी खूप छान संवाद साधत आहे. मलायकाचे चाहते या व्हिडिओवर भरभरून प्रेम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT