Malaika Arora Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika Arora हे ऐकून मलायका अरोरा भडकली अन् म्हणाली, सलमान खानने...

Malaika Arora Career: मलायकाने 'दिल से' मधील 'छईयां-छईयां' आणि त्यानंतर 'दबंग' चित्रपटातील आयटम नंबर 'मुन्नी बदनाम हुई' द्वारे इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी अशी जागा बनवली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडमधील प्रसिध्द अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मलायकाचे पहिले लग्न अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. एका फोटो शूटदरम्यान दोघेही पहिल्यांदा भेटले होते आणि पहिल्याच नजरेत ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असे म्हटले जाते. यानंतर मलायका आणि अरबाजने काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 1991 मध्ये लग्न केले. या लग्नातून त्यांचा मुलगा अरहान खानचाही जन्म झाला. अरहान सध्या परदेशात असून पुढील शिक्षण पूर्ण करत आहे.

'मलायका आणि अरबाजने लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला. पण आता मलायकाला ती सेल्फ मेड असल्याचे का म्हणावे लागले हे जाणुन घेउया. 'दिल से' मधील 'छईयां-छईयां' आणि त्यानंतर 'दबंग' चित्रपटातील (Movie) 'मुन्नी बदनाम हुई' या आयटम साँगने मलाइकाने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली.

मलायकावर बोलताना, इंडस्ट्रीची 'ड्रामा क्वीन' म्हटल्या जाणार्‍या राखी सावंतने (Rakhi Sawant) एकदा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की, सलमान खानच्या (Salman Khan) कुटुंबातील असल्याने मलायकाला 'आयटम गर्ल' म्हणून ओळखले जात नाही.

खान कुटुंबामुळेच मलाइकाला इंडस्ट्रीत अनेक संधी मिळाल्याचेही राखीने म्हटले होते. राखीवर राग व्यक्त करताना मलायका म्हणाली होती की, 'असे असते तर मी सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात आयटम साँग करायला हवे होते. यानंतर मलायका म्हणाली की, 'मी सेल्फ मेड आहे, मला सलमान खानने बनवले नाही'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT