Malaika and Arbaaz Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika and Arbaaz: मलायका - अरबाजची रात्री उशीरा बांद्रा इथं गुपचुप भेट..नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

बांद्रा इथं रात्री उशीरा अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा एकत्र आले होते

Rahul sadolikar

बॉलिवूड एक असं ठिकाण आहे जिथं कधी कुणाचं जुळेल आणि कुणाचं तुटेल? हे सांगणं मुश्किल असतं. कित्येक वेळा कपल पार्टी किंवा इतर ठिकाणी हातात हात घालुन फिरताना दिसतात आणि मग काही दिवसांनी त्यांच्या ब्रेक-अपच्या बातम्या समोर येतात.

बॉलिवूडचे एक फेमस कपल जे आता एकत्र नाही ते म्हणजे अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा. या कपलच्या वेगळं होण्याच्या बातम्या काही लपुन राहिल्या नाहीत. आता हे वेगळं झालेलं कपल आता पुन्हा एकत्र येण्याची चिह्नं दिसतायत

अरबाज आणि मलायका जरी आता एकत्र नसले तरी त्यांच्या मुलासाठी मात्र ते एकत्र येत असतात. मुलाला परदेशात जाताना एअरपोर्ट सोडायला जाताना असो किंवा त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवताना असो दोघे नेहमी एकत्र दिसतात.

काल रात्री अरबाज आणि मलायका एकत्र दिसल्यामुळे सोशल मिडीयावर नेटकऱ्यांच्या भुवया उंंचावल्या आहेत. दोघांचा एकत्र फिरताना व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. काहींनी त्यांच्या एकत्र येण्यावर टोमणे मारले आहेत तर काहींना या व्हिडाओत अरबाज खान हॅंडसम दिसतोय.

या व्हिडीओवर कमेंट करताना एकाने अर्जुन कुठे आहे ? दिसत नाही असंही म्हटलं आहे. या सगळ्या मनोरंजक कमेंट्स मध्ये एक कमेंट अशीही होती ज्यात एक युजर अरबाजचं कोट घालुन येणं जरुरी होतं का असं विचारताना दिसतोय तर दुसऱ्या एका युजरने डिवोर्स झाला असला तरी ते मित्र राहु शकतातच न? आता काय त्यांनी भेटायचंही नाही का ? असं विचारलं आहे.

अलिकडेच 'मूविंग इन विथ मलायका' या शोमध्ये मलायकाने अरबाज खानचं खुपच कौतुक केलं होतं. अरबाज एक एक चांगला माणुस असुन त्याने पडत्या काळात मला खुप साथ दिली असंही म्हटलं आहे. आता मलायका आणि अरबाज अशा भेटींमधुन पुन्हा एकत्र येण्याचा विचार करतायत का हे येणाऱ्या काळात समजु शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT