Main Ki Karaan| laal singh chaddha Dainik Gomantak
मनोरंजन

Main Ki Karaan: 'लाल सिंग चड्ढा'मधील 'मैं की करण' पाहून आठवेल पहिले प्रेम

laal singh chaddha Song Release: हे गाण पहिल्या प्रेमावर आधारित आहे.

दैनिक गोमन्तक

पहिले प्रेम लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण क रून ठेवते. आमिर खानच्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात पहिल्या प्रेमाशी जोडलेल्या गोड आठवणी आहेत ज्या तो कधीही विसरू शकत नाही. 'लाल सिंग चड्ढा' मधील 'मैं की करण' हे नवीन गाण रिलीज झाले आहे. हे गाण पहिल्या प्रेमावर आधारित आहे. (laal singh chaddha latest song)

या गाण्याची सुरुवात आमिरच्या व्हॉईस ओव्हरने होते, जिथे तो ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तो दिवस आठवत नाही तर त्याला एक गोष्ट आठवते ती म्हणजे त्याचे पहिले प्रेम. सोनू निगमने हे गाण गायले आहे तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गीते लिहिली आहेत.

गाण्याबद्दल बोलताना सोनू म्हणाला, "जेव्हा प्रीतमने मला गाण्यासाठी संपर्क साधला तेव्हा त्याने मला सांगितले की, आमिर खानलाच (Amir Khan) मी ते गाणे कसे हवे होते. मी याआधीही आमिरसाठी गाण गायले आहे आणि ती सर्व गाणी सुपरहिट होती आणि प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. मला विश्वास आहे की 'मैं की करण' आमच्या प्रवासात आणखी एक विजेता ठरणार आहे." अद्वैत चंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दशन केले आहे. 'लाल सिंग चड्ढा' 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT