MS Dhoni
MS Dhoni  Dainik Gomantak
मनोरंजन

MS धोनी क्रिकेटनंतर आता दाखवणार चित्रपटांमध्ये आपली कमाल

दैनिक गोमन्तक

तुम्ही क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीला क्रिकेटच्या मैदानात बॅट खूप स्विंग करताना पाहिलं असेल. जेव्हा जेव्हा धोनी बॅट घेऊन मैदानात उतरतो तेव्हा आजही मागून धोनी-धोनीचा आवाज घुमू लागतो. धोनी (MS Dhoni) असेल तर तो सांभाळेल, असे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातून निवृत्ती घेतलेला धोनी आता चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती घेतली होती पण तो अजूनही चेन्नई सुपर किंग्जचा लीडर आहे. धोनीने एकदा सांगितले होते की, प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची आणि काहीतरी नवीन शिकण्याची उर्मी आहे आणि आता हा क्रिकेटर चित्रपटाच्या दुनियेत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे धोनी दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टारसोबत काम करताना दिसणार आहे. (mahendra singh dhoni become film producer for south superstar thalapathy vijay News)

धोनी कॅमिओ रोल करू शकतो

मिळालेल्या मीहितीनुसार आता धोनी निर्माता बनण्याच्या मार्गावर चालण्यास तयार आहे. आणि तो चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय थलापथीसोबत काम करणार आहे. एवढेच नाही तर धोनी (MS Dhoni) स्वतः या चित्रपटात छोटी भूमिका साकारू शकतो असे बोलले जात आहे.

धोनी आणि विजय यांची चांगली मैत्री आहे

एमएस धोनी आणि साउथ सुपरस्टार विजय चांगले मित्र आहेत. असे ऐकले आहे की क्रिकेटरने स्वतःच अभिनेत्याशी फोनवर चित्रपटाबद्दल बोलले आहे. यामुळे विजय धोनीसोबत काम करण्यास नकार देणार नाही.

एमएस धोनीची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे, जर त्याने चित्रपट बनवला तर नक्कीच तो हिट होईल. धोनीला दक्षिण भारतात 'थला' या नावानेही संबोधले जाते. थाला म्हणजे सर्वांचा नेता. महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून बरीच बॅट फिरवली आहे, आता तो निर्माता म्हणून काम करणार आहे. धोनीवर बायोपिक चित्रपट बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याची भूमिका साकारली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT