Maharashtra Shahir: Dainik Gomantak
मनोरंजन

Maharashtra Shahir: राज ठाकरेंच्या हस्ते चित्रपटाचा टीझर रिलिज

Maharashtra Shahir: स्वातंत्र्यचळवळीत शाहीरांचे मोठे योगदान होते असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Shahir: केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा टीझर रिलिज झाला आहे. विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा टीझर रिलिज करण्यात आला आहे. यावेळी केलेल्या भाषणात स्वातंत्र्यचळवळीत शाहीरांचे मोठे योगदान होते असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

या चित्रपटाची चर्चा आणि उत्सुकता गेल्या काही महिन्यांपासून होती. अखेर चित्रपटाचा टीझर रिलिज झाल्यानंतर सगळीकडून यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची व्यक्तीरेखादेखील साकारली गेली आहे.

महाराष्ट्रातील लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.

मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. याबरोबरच केदार शिंदेंची मुलगी सना शिंदे, मृग्मयी देशपांडे आणि अश्विनी महांगडे विविध व्यक्तीरेखेत दिसून येणार आहेत.

महाराष्ट्र( Maharashtra ) शाहीर चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे आणि अजय-अतुल अनेक वर्षानंतर एकत्र काम करताना दिसून येत आहेत. 28 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT