Nitish Bharadwaj Dainik Gomantak
मनोरंजन

'महाभारत' फेम नितीश भारद्वाज यांचा 12 वर्षानंतर झाला घटस्फोट

'महाभारत' (Mahabharat) या प्रसिद्ध मालिकेतील कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज पत्नी स्मितापासून वेगळे झाले आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध टीव्ही मालिका महाभारतमध्ये कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) पत्नी स्मितापासून वेगळे झाले आहे. लग्नाच्या 12 वर्षानंतर दोघे वेगळे झाले आहेत. स्वत: अशी माहिती भारद्वाज यांनी दिली आहे. सध्या स्मिता आपल्या दोन मुलीसोबत इंदूरमध्ये राहती आहे.

एका मुलाखतीमध्ये भारद्वाज यांनी सांगितले की होय मी सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईच्या (Mumbai) फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आमचे वेगळे होण्याचे कारण काय आहे याबाबत मला खोलात जायचे नाहीय. सध्या हे प्रकरण न्यायलयात आहे. मी एवढेच म्हणू शकतो की कधी कधी घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक असू शकतो. विशेषत: जेव्हा तुम्ही एकटे राहत असाल.

ते पुढे म्हणाले की लग्नासारख्या संस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण मी याबाबत भाग्यवान नाही. लग्न मोडण्याची अनेक कारणे असू शकतात. काहीतरी हे हट्टी वृत्तीमुळे किंवा सहानुभूतीच्या अभावामुळे होते किंवा ते अहंकारपणाचे परिणाम असू शकते आणि नेहमी स्वत:बद्दल विचार करतात. परंतु जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा मुले सर्वाधिक प्रवास करतात. यांचा परिणाम मुलांवर होणार नाही याची जबाबदारी पालकांची असते. मुलाखती दरम्यान नितीश भारद्वाज यांना विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या मुलींशी बोलता का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की , मी त्यांना भेटू शकेन की नाही याबाबत मला काहीही बोलायचे नाही. मी स्मिताशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने मॅसेला प्रतिसाद दिला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT